नवी दिल्ली : देशात दहा ऑगस्टपर्यंत 20 लाख कोरोनाबाधित होतील, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला होता. विशेष म्हणजे तीन दिवस आधीच देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा गाठलाय. या पार्श्वभूमिवर राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, देशात 20 लाखांचा आकडा पार झाला असून मोदी सरकार गायब असल्याचं म्हटलंय. राहुल गांधी यांनी 17 जुलै या संदर्भात एक ट्विट केलं होतं.


या गतीने कोरोना वाढत राहिला तर 10 ऑगस्टपर्यंत 20 लाखांहून अधिक कोरोनाबाधित असतील, असं ट्विट राहुल गांधी यांनी 17 जुलैला केलं होतं. सरकारने या महामारीला रोखण्यासाठी ठोस, नियोजित पावलं उचलायला हवीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे सुरुवातीपासूनचं मोदी सरकारवर टीका करत आहे.


...तर 10 ऑगस्टपर्यंत देशात 20 लाख कोरोनाबाधित होतील, राहुल गांधींचा इशारा

कोरोनाला रोखण्यात मोदी सरकारला उपयश : राहुल गांधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाया गेला, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. राहुल बजाज यांच्याशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे आपण पुन्हा आहे तिथेच आलो आहोत. आता केंद्र सरकार सर्व काही राज्यांवर ढकलून हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली होती. जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र, भारतात तब्बल दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

भारतात कोविडचे 20,270,075 रुग्ण
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 20,270,075 रुग्ण आहेत. तर 41,585 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 60,7384 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 137,8105 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीच्या चाचणीला पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला डीसीजीआयची परवानगी