नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा राफेलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. 'उद्या पंतप्रधान मोदींची लोकसभेत राफेलवर परिक्षा आहे, त्यासाठीचे प्रश्न आपण देत आहोत', असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.

राफेल प्रकरणी काल(बुधवार) लोकसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर या प्रकरणी पंतप्रधान मोदी बोलत नाहीत म्हणुन राहुल यांनी त्यांच्यावर टिका केली. राहुल यांनी मोदींसाठी चार प्रश्न आपल्या ट्विटमध्ये दिले आहेत.


राहुल गांधींनी आपल्या आधीच्या ट्विटमध्ये 'प्रश्न क्रमांक ३' दिलेला नव्हता. त्यानंतर काही वेळाने आणखी एक ट्विट करत त्यांनी तिसरा प्रश्न विचारला. 'सभापती मॅडम यांनी गोव्याच्या टेप बद्दल बोलायचे नाही असे सांगितले असल्याने आपण तिसरा प्रश्न मागे ठेवला होता', असे ट्विट त्यांनी केले.