नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदो मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नोटबंदीला चार वर्ष पूर्ण झाल्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकार विरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी आरोप केला आहे की,'नोटबंदी ही पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता. तसेच राष्ट्रीय शोकांतिकेला चार वर्ष झाल्याच्या निमित्ताने तुम्हीही आवाज बुलंद करा, असं आवाहन या व्हिडीओमधून त्यांनी देशातील जनतेलाही केलं आहे.
राहुल गांधी बोलताना म्हणाले की, 'आज भारतासमोर एक मोठा प्रश्न उभा आहे. कोरोना संकट आलं आहे. अशातच प्रश्न हा आहे की, 'बांग्लादेशाची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा पुढे कशी? एकवेळ अशी होती की, भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत उत्तम होती. यावर सरकारकडून कोरोनाचं कारण देण्यात येत आहे. पण कोरोना तर बांग्लादेशातही आहे. संपूर्ण जगभरात आहे. अशातच जर कारण कोरोनाचं असेल तर भारत सर्वात मागे कसा राहिला?' राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, 'भारताची अर्थव्यवस्था मागे राहण्यात कारण कोविड नाही, कारण नोटबंदी आहे. कारण जीएसटी आहे.'
अर्थव्यवस्था नष्ट होण्याचं कारण नोटबंदी : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी या व्हिडीओमध्ये बोलताना म्हटलं की, 'भारताची अर्थव्यवस्था नष्ट होण्याचं एकमेव कारण कोरोना नाहीतर, नोटबंदी आणि जीएसटी आहे. चार वर्षांपूर्वी मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर जाणीवपूर्वक आक्रमण केलं. हे आक्रमण शेतकी, मजूर, तरूण आणि छोट्या दुकानदारांवर होतं.' ते पुढे बोलताना म्हणाले की, 'नोटबंदी सामान्य जनतेच्या पैशांनी मोदी मित्रांचं कर्ज माफ करण्यासाठी लागू करण्यात आली होती.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- CM Uddhav Thackeray : दिवाळीनंतर नियमावली तयार करुन मंदिरं उघडणार : मुख्यमंत्री ठाकरे
- Bihar Election 2020 Exit Poll Results : बिहार निवडणुकीत एनडीए-महागठबंधनमध्ये कांटे की टक्कर; कोणालाही स्पष्ट बहुमत नाही
- ISRO EOS-01| इस्त्रोकडून अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण, आता आंतराळातूनही शत्रूवर नजर शक्य