नवी दिल्ली: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी मणिपूरबाबत (Manipur Violence) लोकसभेत बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. मोदी सरकारनं मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली, असं म्हणत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. यावरून प्रचंड गदारोळ झाला. राहुल मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत गोंधळ केला. सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर राहुल गांधी यांच्या या भाषणातील  एकूण 24 शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. 


हत्या, कत्ल, देशद्रोही, मर्डर शब्द वगळले


मोदी आतापर्यंत मणिपूरला गेले नाहीत, मोदींसाठी मणिपूर भारतात नाहीच, अशी टाकी देखील राहुल यांनी केली.  राहुल गांधीनी आपल्या भाषणात हत्या हा शब्द 15 वेळा वापरला होता.  तसेच  केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी देखील हत्या हा शब्द वापरला होता  तो संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आला आहे. हत्या शब्दाबरोबर कत्ल, देशद्रोही शब्द दोनदा, आणि मर्डर  हत्यारा, हे शब्द एकदा वापरण्यात आला होता. हे सर्व   शब्द कामकाजातून वगळण्यात आले आहेत. 


राहुल गांधी यांनी 15 मिनिटांच्या भाषणातील 24 शब्द वगळले


राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा मिळाल्यानंतर त्यांच्या भाषणाची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्या भाषणात मोदी सरकारवर हल्ला चढवला.  राहुल गांधी यांनी संसदेत एकूण 37 मिनिटे भाषण केले. अविश्वास प्रस्तावादरम्यान  दुपारी 12:09 ते दुपारी 12:46 पर्यंत राहुल गांधी यांनी भाषण केलं. म्हणजेच त्यांनी एकूण 37 मिनिटे सभागृहात आपलं म्हणणं मांडलं. आपल्या भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी 15 मिनिटे 42 सेकंद भाषण केलं. त्या भाषणातील 24 शब्द संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहे.


अधीर रंजन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र


लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. संसद टीव्हीवर राहुल गांधी यांचं भाषण कापून दाखवल्याबद्दल व्यक्त  करत  नाराजी केली. तसेच संसद टीव्ही भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोप अधीर रंजन यांनी केला आहे. तसेच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी राहुल गांधींना पूर्णवेळ संसद टीव्हीने दाखवलं नसल्याचा दावा काँग्रेसकडून (Congress) करण्यात येत आहे.  40 टक्क्यांपेक्षा कमी काळ स्क्रिनवर दाखवले आहे. पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांना नेमकी कशाची भीती वाटत आहे असा सवाल देखील विचारला होता.


हे ही वाचा :


 मणिपूरच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार