मी चौकीदार आहे, मी चोरी केली नाही, करा चौकशी, असं पंतप्रधान का म्हणत नाहीत? मोदी जर दोषी नाहीत, तर ते राफेल घोटाळ्याची चौकशी का करत नाहीत? त्यांनी जेपीसीची मागणी का फेटाळली? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला.
नरेंद्र मोदींनी वैयक्तिकरित्या अनिल अंबानींना कंत्राट मिळवून दिलं. अनिल अंबानींच्या फायद्यासाठी देशात राफेल विमानं यायला उशीर केला, असा आरोपही राहुल गांधींनी केला.
राफेलच्या फाईल्स गहाळ होण्यामागे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मात्र पीएमओची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधींनी केली.
पीएमओचा हस्तक्षेप होता, असं राफेल कराराच्या फाईलमध्ये नमूद केलं होतं. जर कागदपत्रं गायब झाली, तर याचा अर्थ ते खरे आहेत, हे तुम्हीही कबूल करता, विमानांची किंमत वाढवल्याचं कागदपत्रात स्पष्ट नमूद केलं आहे. खऱ्या कागदपत्रांमुळेच राफेलच्या फाईल्स गहाळ झाल्याचा आरोपही राहुल गांधींनी लावला.