नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचं राष्ट्रपती कार्यालय व्हाईट हाऊसने अनफॉलो केलं आहे. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हाईट हाऊसने आमचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना अनफोलो केल्यामुळे मी निराश झालोय. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने याची दखल घ्यावी, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधाच्या निर्यातीला मंजुरी दिल्यानंतर व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन 10 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर अवघ्या 19 दिवसातच व्हाईट हाऊसने मोदींना अनफॉलो केलं.
व्हाईट हाऊसने पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवनासह भारताचे एकूण पाच ट्विटर हॅण्डल फॉलो केले होतं. यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि भारतातील अमेरिकन दूतावास या ट्विटर हॅण्डलला फॉलो केलं होतं. याशिवाय भारतामधील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांनाही फॉलो करण्यात आलं होतं. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. आमचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना व्हाईट हाऊसने अनफोलो केलेल्यामुळे मी निराश झालो आहे. याची आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने दखल घ्यावी, असं ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


व्हाईट हाऊसचा निर्णय आश्चर्यकारक
व्हाईट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलवरुन फॉलो केले जाणारे पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव राजकीय नेते होते. भारत सातत्याने अमेरिकेची मदत करत असतानाही, अमेरिकेच्या राष्‍ट्रपती कार्यालयाने उचललेलं हे पाऊल आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत भारताने अमेरिका आणि ब्रिटन यासारख्या देशांसह जगभरातील अनेक देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. या देशांनी नेत्यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुकही केलं होतं.

Modi's Meet With CMs | पंतप्रधान आणि मुख्यमंत्री बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याचा सूर?