नवी दिल्ली : केंद्र सरकारने राजीव गांधी फाऊंडेशनसह नेहरु-गांधी कुटुंबीयांशी संबधित तीन ट्रस्टच्या चौकशीसाठी गृहमंत्रालयाची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती गांधी कुटुंबियांचा संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या सर्व संस्थांच्या कारभाराची चौकशी करणार आहे. या फाउंडेशनच्या 2005-06 दरम्यान चीनकडून झालेल्या फंडिंगबाबत चौकशी केली जाणार आहे. घाबरवण्यासाठी ही कारवाई केल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं तर, "मिस्टर मोदी यांना वाटतं की सर्व जग त्यांच्यासारखं आहे. त्यांना असं वाटतं की, प्रत्येकाची काही किंमत आहे किंवा प्रत्येकला घाबरवलं जाऊ शकतं. मात्र ते कधीही हे समजू शकणार नाही की सत्यासाठी जे संघर्ष करतात त्यांना घाबरवलं जाऊ शकत नाही."





राजीव गांधी फाऊंडेशनच्या चिनी फंडिंगची चौकशी; कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी गृहमंत्रालयाची समिती

राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तीनही संस्था थेट गांधी कुटुंबाशी निगडीत आहेत. राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गाधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्थांच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी काम पाहतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, राहुल गांधी हे या फाऊंडेशनचे सदस्य आहेत. शिवाय इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचं कामही सोनिया गांधीच पाहतात. या तीनही संस्थांमध्ये मनी लॉंड्रिंग झालंय का? किंवा इन्कम टॅक्सचे घोटाळे झालेत का? विदेशी मदतीच्या नियमाचं उल्लंघन झालंय का? हे तपासून पाहिलं जाणार आहे. केंद्र सरकारनं प्रकरणाच्या चौकशीसाठी आंतर मंत्रालयीन समिती गठित केली आहे. ईडीचे संचालक या समितीचे प्रमुख असणार आहेत.


2005-06 मध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी या सत्ताधारी पक्षाकडून राजीव गांधी फाऊंडेशनला 30 लाख अमेरिकी डॉलर्सचा निधी दिल्याचा आरोप आहे. चीन सीमेवरच्या घटनेनंतर राहुल गांधी जेव्हा आक्रमकपणे सरकारला प्रश्न विचारु लागले, त्यानंतर भाजपनं हा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेस आणि चीनचे गुप्त संबंध असल्याचा आरोपही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला होता. शिवाय याच मदतीच्या बदल्यात भारत आणि चीनमधल्या व्यापारी संबंधात अनुकूलता दिली गेली, असाही आरोप करण्यात आला आहे.


संबंधित बातम्या