Continues below advertisement

Rahul Gandhi Push Ups Penalty : मध्यप्रदेशातील पचमढीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधींना दोन मिनिटांचा उशीर महागात पडला. शिबिरातील अनुशासन (Discipline Rules) मोडल्यामुळे काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 10 पुशअप (10 Push-Ups) काढण्याची शिक्षा देण्यात आली. काँग्रेसने सर्वांसाठी समान नियम असल्याचा दावा केला असला तरी, या घटनेने पुन्हा एकदा राहुल गांधींची शिस्त अधोरेखीत झाली आहे.

काँग्रेसमध्ये सर्वांसाठी समान नियम (Equal Rules In Congress)

काँग्रेसचे मीडिया समन्वयक अभिनव बरोलिया यांनी सांगितले की, शिबिरात कडक अनुशासन पाळले जाते आणि कोणालाही विशेष वागणूक दिली जात नाही. राहुलजींसाठी हे काही नवीन नाही. आमच्या पक्षात सर्व समान आहेत. भाजप सारखी ‘बॉसगिरी’ येथे नाही.

Continues below advertisement

शिबिरात उशीराची ठरलेली शिक्षा (Penalty For Delay)

पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी ‘संगठन सृजन अभियान’अंतर्गत शिबिरात उशीर करणाऱ्यांसाठी 10 पुशअप ही शिक्षा निश्चित केली होती. 2028 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे आणि तो 11 नोव्हेंबरला संपणार आहे.

बिहार प्रचारासाठी पुन्हा प्रस्थान (Rahul Returns To Bihar Campaign)

राहुल गांधी त्याच दिवशी बिहार निवडणूक प्रचारासाठी रवाना झाले. गेल्या पाच महिन्यांत मध्यप्रदेशचा हा त्यांचा दुसरा दौरा होता. राहुल गांधींनी जूनमध्येच ‘संगठन सृजन अभियान’ला सुरुवात केली होती.

भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका (Rahul’s Allegations On BJP)

सध्या राहुल गांधी सतत चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीत गंभीर अनियमिततेचे आरोप केले. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, हरियाणामध्ये '25 लाख मतांची चोरी' झाल्याचे पुरावे काँग्रेसकडे आहेत आणि ते हळूहळू सार्वजनिक केले जातील.

भाजपा प्रवक्त्यांचा पलटवार (BJP Counterattack)

भाजपा प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हटले की, “राहुल गांधींसाठी LOP म्हणजे ‘लीडर ऑफ टूरिझम अँड पार्टी’ असं आहे. निवडणुका बिहारमध्ये आणि ते पचमढीत सफारी करत आहेत. पराभवानंतर ते नेहमीप्रमाणे निवडणूक आयोगालाच दोष देतील.”

ही बातमी वाचा: