मुंबई : ‘माझे वडील देशासाठी जगले आणि देशासाठीच त्यांनी बलिदान दिलं. त्यामुळे कुठलंतरी एक कॅरेक्टर हे सत्य बदलू शकत नाही,’ असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ सीरिजच्या वादावर भाष्य केलं आहे.
नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ सीरिजमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली, असा आरोप करत पश्चिम बंगालमधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती. या वादावरच राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं आहे.
‘बीजेपी आणि आरएसएसला वाटतं की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. पण स्वातंत्र्य हा आपला मुलभूत हक्क आहे, असं मला वाटतं. माझे वडील देशासाठी जगले आणि देशासाठीच त्यांनी बलिदान दिले. कोणत्यातरी काल्पनिक वेब सीरिजमुळे हे सत्य बदलणार नाही,’ असं ट्वीट करत या वादावर त्यांनी आपली भूमिका मांडली.
प्रकरण काय आहे ?
ऑनलाईन प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, सेक्रेड गेम्सचे निर्माते आणि अन्य काही व्यक्तींवर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान केल्याचा आरोप पश्चिम बंगालमधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने केला.
या सीरिजमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने राजीव गांधी यांना शिवीगाळ केली, असं या तक्रारीत म्हणण्यात आलंय.
‘सेक्रेड गेम्स’ काय आहे ?
‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 6 जुलैला रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये 80 च्या दशकातील घटनांचा संदर्भ घेतला गेला आहे. यामध्ये सैफ अली खान सरताज सिंह या पोलीस ऑफिसरची भूमिका साकारत आहे, तर नवाजुद्दीन गँगस्टर गणेश गायतोंडेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
वेब सीरिजचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या दोघांनी केलं आहे. मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हीदेखील ‘सेक्रेड गेम्स’मध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे.
एका कॅरेक्टरमुळे सत्य बदलणार नाही, ‘सेक्रेड गेम्स’ वादावर राहुल गांधींचं भाष्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2018 10:18 PM (IST)
नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ सीरिजमध्ये राजीव गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली, असा आरोप करत पश्चिम बंगालमधील एका काँग्रेस कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -