लोकसभेत दलित अत्याचाराची चर्चा सुरु असताना राहुल गांधींना डुलकी?
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2016 02:43 AM (IST)
नवी दिल्ली: गुजरातच्या उनाप्रकरणावरुन लोकसभेत खडाजंगी सुरु असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी डुलकी घेत असल्याचं समोर आलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनं याप्रकरणी सारवासारव केली आहे. गुजरातच्या उनामध्ये गोहत्येच्या संशयावरुन काही तरुणांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी संसदेत जोरदार राडा सुरु होता. काँग्रेस या मुद्द्यावर आक्रमक झालेली पहायला मिळाली. मात्र, पक्षाचे उपाध्यक्षच डुलक्या घेत असल्यानं काँग्रेसची आता चांगलीच गोची झाली आहे. फोटोमध्ये पाहिलं असता राहुल गांधी डुलक्या घेत असल्याचं दिसंत आहे. पण काँग्रेसकडून या गोष्टीचं खंडन करण्यात आलं आहे. याबाबत कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, याबाबत बोलताना काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या की, "दिल्लीत वातावरण गरम आहे. त्यामुळे बाहेरुन कोणी आत आलं की, डोळ्यांना जळजळ जाणवते. त्यामुळेच इथं कुणीही थोड्या वेळासाठी डोळे बंद करतं.