Khushbu Sundar Viral Tweet : मोदी आडनावावर मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे राहुल गांधींची खासदारकीही रद्द झाली आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून देशभरात निदर्शने काढली जात आहे. भाजप नेत्या खूशबू सुंदर यांनी काँग्रेसमध्ये असताना मोदींविरोधात केलेले ट्वीट व्हायरल झाले आहे. काँग्रेस नेत्यांनी या ट्वीटचा हवाला देत आता खूशबू संदुर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार का? त्यांच्यावर कोणती कारवाई करणार का? असा वला उपस्थित केला आहे. 


व्हायरल होणारे ट्वीट काय होते?
अभिनेत्री असणाऱ्या खूशबू सुंदर हिने आपली राजकीय कारकिर्द सुरु केली होती. काँग्रेसमध्ये असताना 2018 मध्ये खूशबू सुंदर यांनी मोदींच्या विरोधात एक ट्विट केले होते. मोदी आडनावाच्या मागे भ्रष्टाचार आडनाव लागल्याचे ट्वीट सूंदर यांनी केले होते. हे ट्वीट अद्याप खूशबू सुंदर यांच्या ट्वीटर खात्यावर तसेच आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते की,  "यहां मोदी वहां मोदी जहां देखो मोदी...लेकिन ये क्या? हर मोदी के आगे भ्रष्टाचार सरनेम लगा हुआ है... चलिए मोदी नाम का मतलब ही भ्रष्टाचार कर देते हैं. #Nirav #Lalit #Namo = Corruption.."






काँग्रेसने साधला निशाणा - 
काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हे ट्वीट रिट्विट करत अथवा स्क्रीन शॉट शेअर करत भाजपावर टीकास्त्र सोडलेय. दिगविजय सिंह यांनीही ट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे. गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी खुशबू सुंदर यांच्याविरोधात खटला दाखल करणार का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जातोय. खूशबू सुंदर सध्या भाजपच्या सदस्य आहेत. त्याशिवाय त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्याही आहेत. 
 






आणखी वाचा  :


राहुल गांधींची खासदारकी रद्द करणं, हा एका अर्थाने मोदींचा नैतिक पराभव - सुषमा अंधारे