नवी दिल्ली :  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुजरात हायकोर्टात धाव घेतली आहे. मानहानी प्रकरणात दोषित्व स्थगित करावं, अशी विनंती राहुल यांनी हायकोर्टाला केली आहे. सुरत सत्र न्यायालयानं दोषित्व स्थगित करण्यास नकार दिला होता. त्यामुळे राहुल यांची खासदारकी रद्दच राहिली. सुरतच्या महान्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सेशन कोर्टानं नकार दिला. त्यामुळे राहुलना आता हायोकोर्टाची पायरी चढावी लागली आहे. 


राहुल गांधींना सुरत कोर्टानं 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा  शिक्षा सुनावली होती. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यातल्या तरतुदीनुसार पुढच्या चोवीस तासातच लोकसभा सचिवालयानं अपात्रतेची कारवाई केली. 19 एप्रिल 2019 रोजी एका प्रचार सभेत राहुल गांधीन मोडी आडनावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. 


मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधातील राहुल गांधींचा अर्ज सुरत कोर्टाने फेटाळला आहे. सुरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी आता हायकोर्टात दाद मागणार आहेत.  दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळं राहुल गांधींनी हायकोर्टात धाव घेतली आहे. 


दिल्लीत काँग्रेसकडे वरिष्ठ वकिलांची टीम आहे. अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वत: एक निष्णात वकील आहेत. तेच याबाबतच्या कायदेशीर बाबी हाताळत आहेत.  अपात्रतेच्या काही केसेसमध्ये वरच्या कोर्टानं स्थगिती दिली की नंतर दिलासाही मिळतो. राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फझल हे त्याचं ताजं उदाहरण. लक्षद्वीपच्या या खासदारालाही अपात्र ठरवलं, पोटनिवडणुकही जाहीर झाली होती. पण केरळ हायकोर्टानं शिक्षेला स्थगिती दिली आणि नंतर या सगळ्या गोष्टी थांबल्या. राहुल गांधींनी वरच्या कोर्टात  धाव घेतली आहेत्यांनाही दिलासा मिळेल अशी चर्चा आहे.


तुघलक लेनचा शासकीय बंगला सोडला


दरम्यान, सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी राजधानी दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगला सोडला. हा शासकीय बंगला सोडताना राहुल गांधी भावूक झाल्याचं दिसून आलं. सत्य बोलण्याची किंमत मी चुकवत आहे, मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, 19 वर्षांनंतर मी घर सोडत आहे. हे घर देशातील जनतेचे आहे, मी आता 10 जनपथवर राहणार आहे. त्यांनी लोकसभा सचिवालयाला बंगल्याच्या चाव्या सुपूर्द केल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Karnataka Election 2023 : आम्ही 70 वर्षात लोकशाही वाचवली, तुम्हाला पंतप्रधान बनवलं, मल्लिकार्जुन खरगे यांचं भाजपला उत्तर