नवी दिल्ली : जीएसटी आणि नोटाबंदीवरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधला आहे. "डॉ. जेटली, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे.", अशा शब्दात राहुल गांधींनी जेटलींवर टीका केली.
अरुण जेटलींवर टीका करताना राहुल गांधींनी म्हटले, "डॉ जेटली, नोटबंदी और GST से अर्थव्यवस्था ICU में है. आप कहते हैं आप किसी से कम नहीं, मगर आपकी दवा में दम नहीं."
https://twitter.com/OfficeOfRG/status/923409366132256768
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी प्रचारात व्यस्त आहेत. मात्र ते सोशल मीडियावरुन कायमच सक्रीय असतात. आज अरुण जेटलींवरील टीकाही त्यांनी ट्विटरवरुनच केली.
https://twitter.com/OfficeOfRG/status/922695603380879360
नोटाबंदी, जीएसटी हे मुद्दे सध्या राहुल गांधींच्या अजेंड्यावर आहेत. या मुद्द्यांवरुन मोदी सरकार आणि अरुण जेटलींवर निशाणा साधण्याची संधी ते सोडत नाहीत. गुजरातमधील प्रचारादरम्यान राहुल गांधींनी जीएसटीला तर 'गब्बर सिंग टॅक्स' म्हटलं होतं.
डॉ. जेटली, अर्थव्यवस्था आयसीयूत आहे : राहुल गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Oct 2017 11:34 AM (IST)
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी प्रचारात व्यस्त आहेत. मात्र ते सोशल मीडियावरुन कायमच सक्रीय असतात.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -