मोदींनीही राहुल गांधींच्या ट्वीटला उत्तर दिलं. ‘शुभेच्छांबद्दल धन्यवाद, लोकशाही जिंदाबाद’, असं उत्तर मोदींनी दिलं.
दरम्यान राहुल गांधींनी पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी कॅप्टन अमरिंदर सिंह यांचंही अभिनंदन केलं. पंजाबमध्ये काँग्रेसने अकाली दल-भाजपचा पराभव करत दणदणीत यश मिळवलं आहे. पंजाबच्या 117 जागांपैकी 77 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला.
देशातील जनतेचं मन जिंकत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा संघर्ष कायम राहील, असंही राहुल गांधी म्हणाले.
पंजाबमध्ये काँग्रेसची मुसंडी
पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने बहुमताचा 59 हा आकडा सहजरित्या पार केला आहे.
काँग्रेसने 70 जागा जिंकल्या असून 8 जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत.
पंजाबमधील पक्षीय बलाबल :
काँग्रेस : 78
आम आदमी पक्ष : 20
अकाली दल 14 + भाजप 3 : 17
लोक इन्साफ पार्टी : 02
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय
2014 च्या लोकसभा निवडणुकांनंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये मोदी लाट दिसली. याच मोदी लाटेवर सवार होत भाजपने 300 पेक्षा अधिक जागा मिळवत बहुमताने विजय मिळवला.
उत्तर प्रदेशात एवढ्या जागांवर विजय मिळवणारा भाजप पहिलाच पक्ष ठरला आहे. 1980 साली काँग्रेसने 309 जागा मिळवल्या होत्या. यापर्वी भाजपने 1991 साली मोठा विजय मिळवला होता. 1991 साली भाजपनं 221, काँग्रेसनं 46, जनता दलनं 92, जनता पार्टीनं 34 आणि बसपनं 12 जागा मिळवल्या होत्या.
संबंधित बातम्या :