छत्तीसगड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही व्यासपीठावर राफेलबाबत माझ्याशी 15 मिनिटे चर्चा करण्यास तयार व्हावे, असे थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना दिले आहे. शनिवारी अंबिकापूर येथील रॅलीदरम्यान राहुल गांधी बोलत होते.
राहुल म्हणाले की, "मी नरेंद्र मोदी यांना आव्हान देतो, मोदींनी केवळ 15 मिनिटे राफेल विषयावर माझ्याशी चर्चा करावी. मी अनिल अंबानी आणि फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केलेल्या विधानांवर आणि राफेल विमानांवर बोलणार आहे. मोदींनी राफेल विमानांमध्ये घोटाळा केल्याचे सुरक्षा मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले होते. तसेच पंतप्रधानांनी कुठल्याही कायद्याचे पालन केलेले नाही. पंतप्रधान माझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देणार नाहीत."
यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यानंतर 10 दिवसाच्या आत छत्तीसगड मधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच मागील दोन वर्षात शेतकऱ्यांना बोनस देण्यात आला नाही. त्यामुळे निवडणूकीनंतर शेतकऱ्यांना बोनसदेखील देणार असल्याचे आश्वासन राहुल यांनी दिले
राफेल विषयावर माझ्याशी 15 मिनिटे चर्चा करा! राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना चॅलेंज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Nov 2018 03:25 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही व्यासपीठावर राफेलबाबत माझ्याशी 15 मिनिटे चर्चा करण्यास तयार व्हावे, असे आव्हान राहुल गांधी यांनी मोदींना दिले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -