Rahul Gandhi Security Breach:  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसने (Congress) सरकारला जाब विचारला होता. त्याला आता केंद्रीय गृह मंत्रालयाने उत्तर दिलंय. राहुल गांधी यांनीच सुरक्षेचे नियम मोडले असल्याचं उत्तर गृह मंत्रालयाने दिलंय. त्याचसोबत, राहुल गांधी यांनी तीन वर्षांत तब्बल 113 वेळा सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलंय आणि त्यांना वेळोवेळी सूचनाही दिल्या होत्या असा खुलासाही केंद्रीय गृह खात्याने केलाय.


सीआरपीएफने कॉंग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधीनी तीन वर्षात तब्बल 113 वेळा सुरक्षा नियमांचं उल्लंघन केले आहे. या विषयी त्यांनी माहिती देण्यात आली आहे.  भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah) पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे.  गृहमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. 


सीआरपीएफला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की,  राहुल गांधीच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणताही हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही.  सीआरपीएफने म्हटले आहे की, राहुल गांधीच्या व्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही.फक्त सुरक्षा मिळालेल्या व्यक्तीने सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान राहुल गांधी यात्रेत अनेकदा यात्रेत सुरक्षा कवच तोडून लोकांना भेटण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफने म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधीच्या सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.  सुरक्षा देण्यात आलेल्य व्यक्तीला सीआरपीएफने दिलेल्या आदेशनुसार राज्य पोलिस, सुरक्षा यंत्रणेशी समन्वय साधत सुरक्षा व्यवस्था देण्यात येते.  गृहमंत्रालयाद्वारे तैनात सुरक्षेसंदर्भात राज्य सरकार आणि राहुल गांधी बरोबरच कॉंग्रेसला देखील माहिती देण्यात आला आहे. 


राहुल गांधी भारत जोडो यात्रा


राहुल गांधी सप्टेंबर महिन्यात कन्याकुमारीतून निघाले त्यांनी 2800 किलोमीटर अंतर पायी कापलं आहे. केरळ, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आता राजस्थानातून यात्रा पुढं चालली आहे.  राहुल गांधींची यात्रा पुढं दिल्ली, यूपी, पंजाब मार्गे जम्मू आणि शेवटी श्रीनगरमध्ये पोहोचणार आहे. प्रजासत्ताक दिनाला यात्रा काश्मीरमध्ये असेल. देश जोडताना राहुल गांधींसमोर काँग्रेसच्या नेत्यांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचंही आव्हान आहे.   यात्रा सुरु असतानाच हिमाचलमध्ये विजयी झालेल्या काँग्रेसनं गुजरातमध्ये सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणण्याचं आव्हान राहुलसमोर असणार आहे.