राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमधुन असा प्रश्न विचारला आहे की; "माननीय पंतप्रधान आज आपण संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधन करणार आहे. त्यावेळी देशवासियांना हे सांगा की भारताच्या हद्दीतून चीनला कधी हाकलणार".
भारत आणि चीनच्या सीमेवर गेली सहा महिने तणाव आहे. यावर राजकीय आणि लष्करी पातळीवर अनेक बैठका झाल्या आहेत पण अजूनही तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांनी या सीमेवर मोठं सैन्य तैनात केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्राला संबोधित करणार आहेत. बिहारची निवडणूक आणि आणखी काही राज्यांतील पोट निवडणूका लक्षात घेता त्यांच्या या भाषणाला विशेष महत्व आले आहे.
भारतात कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्यापासून मोदींनी आतापर्यंत सहा वेळा देशाला संबोधन केलं आहे. आजचे संबोधन हे सातवे संबोधने असेल.