Rahul Gandhi : कर्नाटकमध्ये केलेल्या वक्तव्यानंतर गुजरातमधील सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी भाजपवर कडाडून प्रहार केला. मी मोदींना प्रश्न न विचारता अदानींवरुन प्रश्न विचारत आहे. तुम्ही पीएम मोदींना वाचवा, मात्र, भ्रष्ट अदानींना भाजप कशासाठी वाचवत आहे? कारण तुम्हीच अदानी आहात असा हल्लाबोल त्यांनी केला. जनतेला माहित आहे अदानी भ्रष्ट, मग पंतप्रधान मोदी अदानींना का वाचवत आहेत? अदानींवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला म्हटले जात आहे. देश म्हणजे अदानी आणि अदानी म्हणजे देश आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली. 


माझ्या भाषणाला घाबरले 


माझ्या पुढच्या भाषणाची पंतप्रधानांना भीती वाटल्याने मला अपात्र ठरवण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले. माझ्या पुढच्या भाषणाची त्यांना भीती वाटत होती. जे अदानींवर  होते. मी त्यांच्या डोळ्यात ते पाहिले. त्यामुळे ते माझ्या पुढच्या भाषणाबद्दल घाबरले होते. संसदेतील पुढचे भाषण मी करावे अशी त्यांची इच्छा नव्हती. मी संसदेत आहे की बाहेर मला काही फरक पडत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. मला माझी तपश्चर्या करायची आहे, ते करून दाखवीन. मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. नरेंद्र मोदींशी अदानी यांचा काय संबंध? मी या लोकांना घाबरत नाही. जर त्यांना वाटत असेल की माझे सदस्यत्व रद्द करून, धमकावून, मला तुरुंगात पाठवून ते मला बंद करू शकतात. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन.


राहुल गांधी म्हणाले,  भारत जोडो यात्रेवरील माझे कोणतेही भाषण पाहा, सर्व समाज एक आहेत असे मी नेहमीच म्हटले आहे. द्वेष नसावा, हिंसा नसावी. हा ओबीसीचा प्रश्न नाही, नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांचा मुद्दा आहे. भाजप लक्ष विचलित करण्याचे काम करते, कधी ओबीसींबद्दल बोलते, तर कधी परदेशाबद्दल बोलते.


राहुल म्हणाले की, ही अदानी यांची शेल कंपन्या आहेत त्यात कोणीतरी 20 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. हा पैसा अदानीजींचा नाही. 20 हजार कोटी कोणाचे हा प्रश्न मी संसदेत विचारला होता. मी अदानी आणि मोदी यांच्यातील संबंध उघड केले. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांची अदानींशी मैत्री आहे. दोघेही विमानात प्रवास करायचे. अदानींच्या घोटाळ्याबाबत मी संसदेत पत्र लिहिले, पण काहीही झाले नाही. काही नेत्यांनी सांगितले की, मी विदेशी शक्तींची मदत घेतली, असे काही नाही. मी बरीच पत्रे लिहिली पण उत्तर मिळाले नाही. मी लोकसभा सभापतींना सांगितले की मला बोलू दिले जात नाही, ते हसले आणि म्हणाले की मी काहीही करू शकत नाही. मी भविष्यात मोदींना प्रश्न विचारणार आहे की 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत. मला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही.


इतर महत्वाच्या बातम्या