Rahul Gandhi-Priyanka Gandhi Vadra At J&K : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या जम्मू-काश्मीरच्या (Jammu & Kashmir) दौऱ्यावर आहेत. गुलमर्ग इथे त्यांनी बहिण प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांच्यासोबत स्नोमोबाईल (Snowmobile) चालवण्याचा आनंद लुटला. राहुल आणि प्रियंका यांचे स्नोमोबाईल चालवतानाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही भावंडं बर्फातून स्नोमोबाईल चालवताना दिसत आहेत.
भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी स्की गॉगल घालून स्नोमोबाइल चालवताना दिसत आहेत तर प्रियंका गांधी वाड्रा या त्यांच्या मागे बसलेल्या दिसत आहेत.
यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी उत्तर काश्मीरमधील गुलमर्गमध्ये स्कीईंग करायला गेले होते. राहुल गांधी यांनी बुधवारी (15 फेब्रुवारी) गोंडोला केबल कारमधून प्रवास केला होता आणि तिथे उपस्थित असलेल्या अनेक पर्यटकांसोबत सेल्फीही काढल्या होत्या. यशस्वी भारत जोडो यात्रेनंतर एक परिपूर्ण सुट्टी असं वर्णन काहींनी त्यांच्या काश्मीर भेटीचं केलं.
3,970 किलोमीटरचे अंतर कापून भारत जोडो यात्रेची सांगता
नुकतेच राहुल गांधी यांनी 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये 3,970 किलोमीटरचे अंतर कापून भारत जोडो यात्रेची सांगता केली. कन्याकुमारी ते काश्मीर असा हा प्रवास झाला. त्यानंतर राहुल गांधी दोन वेळा काश्मीरच्या वैयक्तिक दौऱ्यावर आले होते. कुठे त्यांनी गुलमर्गमध्ये कधी स्कीईंग तर कधी स्नोमोबाईल राईड केली.
'Eviction Drive म्हणजे समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची खेळी'
ज्या दिवशी राहुल गांधी काश्मीरमधील पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली त्याच दिवशीच स्नोमोबाईलवरील दोन्ही भावंडांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या बेदखल मोहिमेवरुन भाजपवर टीका केली. नागरिकांचं खऱ्याखुऱ्या समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक खेळलेली खेळी आहे असं राहुल गांधी म्हटलं.
जम्मू-काश्मीरमधील लोकांना न्याय मिळवून देण्यात कसर ठेवणार नाही : राहुल गांधी
यासोबतच त्यांनी पक्षाच्या नेत्यांना असंही सांगितलं की मी जम्मू-काश्मीरला भेट देत राहिन. कारण मला त्यांच्या वेदना आणि व्यथा जाणवत आहेत, जम्मू-काश्मीरमधील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही.
संबंधित बातमी
Rahul Gandhi Gulmarg: राहुल गांधी सुट्टीवर, गुलमर्गमध्ये घेतायत स्कीईंगचा आनंद