पणजी : गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. गोवा बोर्डाच्या अल्टो बेतिममधील मुख्यालयात निकालाची घोषणा करण्यात आली. औपचारिक घोषणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. तसंच goaresults.nic.in आणि gbshse.gov.in या वेबसाईटवरही विद्यार्थी निकाल पाहू शकतील. गोवा बोर्डाच्या HSSC ची परीक्षा यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आली होती. राज्याच्या 16 केंद्रांवर परीक्षा पार पडली. कला शाखेतील 3,338, वाणिज्य शाखेतील 5,021, विज्ञान शाखेतील 4,735 आणि व्यावसायिक शाखेतील 2,724 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना 14 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या दरम्यान संबंधित कॉलेजमध्ये गुणपत्रिका मिळेल. खालील बेवसाईटवर निकाल जाहीर होईल