Deep Sidhu : पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा (Deep Sidhu) मंगळवारी अपघातात मृत्यू झाला आहे. दिल्लीजवळील कुंडली सीमेवर त्याच्या कारला अपघात झाला होता. परंतु, या अपघातानंतर उलट-सुलट चर्चा होत असतानाच आता एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने या घटनेबाबत माहिती दिली आहे. या प्रत्यक्षदर्शीने अपघातावेळी घटनास्थळी मदतही केली होती. यूसुफ नावाच्या या व्यक्तीने दीप सिद्धूचे बंधू मनदीप यांना फोनवरून अपघाताबद्दल माहिती दिली होती.
दीप सिद्धू याचा अपघात झाला, त्यावेळी यूसुफ हे आपल्या आईसोबत पानीपत येथे निघाले होते. यावेळीच दीप याच्या कारचा अपघात झाला. यावेळी यूसुफ यांनी कारमधील दीप सिद्धू आणि त्याची मैत्रीण रीना यांना मदत केली होती.
या अपघाताबाबत यूसुफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बादली टोलनाका ओलांडल्यानंतर काही वेळातच दीप याच्या कारचा अपघात झाला. यावेळी यूसुफ यांची कार दीप याच्या कारच्या मागे होती. अपघात झाला त्यावेळी सिद्धू याच्या कारचा वेग जवळपास ताशी 100 ते 120 प्रति किलोमीटर होता तर सिद्धू याच्या गाडीपुढे असलेला ट्रकचा वेग ताशी 40 ते 50 प्रति कोलोमीटर होता. दीप याच्या गाडीने ट्रकला मागून धडक दिली. त्यानंतर युसूफ यांनी तत्काळ आपली कार ट्रकच्या पुढे उभा केली आणि चालकाला खाली उतरवले. यावेळी दीप सिद्धू हे स्टेअरिंग आणि सीटमध्ये पूर्णपणे अडकले होते.
यूसुफ यांनी कारमधील दीपच्या मैत्रीणीला प्रथम बाहेर काढले. या मैत्रीणीने दीप याच्या भावाचा नंबर सांगितला. त्यानंतर यूसुफ यांनी मनदीप यांना या अपघाताबद्दल माहिती दिली. त्यानंतर दिल्लीतील सोनू नाव्याच्या एका व्यक्तीचा यूसुफ यांना फोन आल्यानंतर त्यांना अपघाताचे ठिकाण सांगितले.
अपघातानंतर यूसुफ यांनी मदतीसाठी अनेक गाड्यांना हात केला. परंतु, पाच मिनिटे कोणीच थांबले नाही. पाच मिनिटानंतर काही गाड्या मदतीसाठी थांबल्या. अपघातानंतर काही वेळ दीप याचा श्वास सुरू होता. परंतु, तो कारच्या आत पूर्णपणे अडकले होते. कारमधील दोन्ही एअर बॅगही उघडल्या होत्या. दीप स्टेअरिंगच्या आणि सीटच्यामध्ये अडकला होता. त्यामुळे लोखंडी रॉडने स्टेअरिंग तोडून त्याला बाहेर काढण्यात आले. ट्रक चालकाने आधीच 112 नंबरवरून पोलिसांना माहिती दिली होती. दोन अॅम्बुलेन्स घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यातील एका अॅम्बुलेन्समधून दीप याला तर दुसऱ्या अॅम्बुलेन्समधून त्याची मैत्रीण आणि तिचे साहित्य नेण्यात आल्याचे यूसुफ यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
Deep Sidhu Death : पंजाबी सिने-अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू!
Farmers Tractor Rally | Who is Deep Sidhu? | कोण होता दीप सिद्धू?