Punjab New CM: पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथी दरम्यान, मुख्यमंत्रीपदाबाबत संभ्रम आहे. या सगळ्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांचेही नाव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून समोर आले. मात्र, एबीपी न्यूजशी झालेल्या संभाषणादरम्यान अंबिका सोनी यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते या पदाच्या शर्यतीत नाहीत. हिच गोष्ट हायकमांडला सांगितल्याचे त्यांनी सांगितले आहे.


Amarinder Singh On Sidhu : कुणीही चालेल पण सिद्धू मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर विरोध करणार : कॅप्टन अमरिंदर सिंह


एबीपी न्यूजशी संभाषणादरम्यान अंबिका सोनी म्हणाल्या की, पंजाबचे मुख्यमंत्री शीख चेहरा असावेत अशी त्यांची इच्छा आहे. राहिला मी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याबद्दल तर त्यांनी काँग्रेस हायकमांडसमोर आपली स्थिती आधीच स्पष्ट केली आहे. अंबिका सोनी म्हणाल्या की, त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी ती नाकारली आहे.


Punjab CM : नवज्योतसिंह सिद्धू की सुनिल जाखड? पंजाबचा नवा 'कॅप्टन' कोण? 


अंबिका सोनी यांचे नाव शनिवारी संध्याकाळी चर्चेत आले जेव्हा त्यांनी रात्री उशिरापर्यंत राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. अंबिका सोनी पंजाबच्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी काँग्रेस हायकमांडची इच्छा आहे. कारण अंबिका सोनी मुख्यमंत्री झाल्यामुळे स्थानिक विरोध नगण्य असेल. यामुळे निवडणुकीपूर्वी पक्षात सुरू असलेला गोंधळ आणि परस्पर मतभेद दूर होण्यास मदत होईल. पण अंबिका सोनीच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता.


CM Amarinder Singh Resigns: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांना खुर्ची का गमवावी लागली?


शीख चेहरा मुख्यमंत्री पदावर असावा या अंबिका सोनी यांच्या वक्तव्यामुळे आता सुनील जाखड हेदेखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण अंबिका सोनीसोबतच मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून सुनील जाखड यांचे नावही चर्चेत होते. अंबिका सोनी यांच्या या वक्तव्यानंतर आता पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि सुखजिंदर सिंह रंधवा यांच्यातील स्पर्धा कमी होताना दिसते आहे. पण मुख्यमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडचा असेल आणि काँग्रेस हायकमांड सर्व पैलूंवर विचार करत आहे.