चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने बहुमताचा 59 हा आकडा सहजरित्या पार केला आहे.
काँग्रेसने 70 जागा जिंकल्या असून 8 जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेस : 78
आम आदमी पक्ष : 20
अकाली दल 14 + भाजप 3 : 17
लोक इन्साफ पार्टी : 02
कॅप्टन अमरिंदर सिंह पटियाला आणि लम्बी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु त्यांचा पटियाला मतदारसंघातून विजय झाला. तर लम्बीमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी विजय मिळवला.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पंजाबमध्ये मोठा विजय मिळवला. त्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन अमरिंदर सिंह यांचं अभिनंतर केलं.
तर निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योतसिंह सिद्धू यांचाही अमृतसर मतदारसंघातून विजयी झाले. जनतेने दुष्टांच्या अहंकाराला नामोहरम केलं. पंजाबमध्ये काँग्रेसचा पुनर्जन्म झाला, बदल्याची भावना मागे सोडून विकास करायचा आहे, अशी प्रतिक्रिया नवज्योतसिंह सिद्धू यांनी दिली.