पुणे : पुण्यातील एका पोलिस दाम्पत्याने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. तारकेश्वरी आणि दिनेश राठोड हे माऊण्ट एव्हरेस्ट एकत्र पादाक्रांत करणारं पहिलं भारतीय जोडपं ठरलं आहे.
महाराष्ट्र पोलिसात असलेल्या तारकेश्वरी भालेराव राठोड आणि दिनेश राठोड यांनी सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर केलं. पुण्यातील हे दाम्पत्य महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातून माऊण्ट एव्हरेस्ट एकत्र सरणारं एकमेव जोडपं ठरलं आहे. 30 वर्षीय तारकेश्वरी आणि दिनेश हे दोघंही 2006 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. दोघंही पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत.

 

 

दोघं 2008 मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासूनच एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं स्वप्न उराशी बाळगल्याचं ते सांगतात. इतकंच काय, एव्हरेस्टवर पाऊल ठेवेपर्यंत अपत्यसुख अनुभवायचं नाही, अशी खूणगाठही त्यांनी मनाशी बांधली होती. त्यामुळे हा अभिमानाचा क्षण अनुभवल्यानंतर बाळाची चाहूल घेण्यासही ते उत्सुक आहेत.

 

 

राठोड दाम्पत्याला साहसी खेळांची आवड आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखरावरही त्यांनी यशस्वीपणे पाऊल ठेवलं असून स्काय डायव्हिंग सारख्या काही खेळातही ते सहभागी झाले आहेत.

 

 

एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्राचे पहिले आयपीएस सुहेल शर्मा


 

 

काहीच दिवसांपूर्वी मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं. एव्हरेस्टला गवसणी घालणारे ते महाराष्ट्रातील पहिले आयपीएस अधिकारी ठरले होते. औरंगाबादचे पोलीस हवालदार रफिक शेख यांनीही नुकताच एव्हरेस्ट पादाक्रांत केला होता.

 

 

मुलींच्या एनसीसी टीमने सर केलं एव्हरेस्ट शिखर


एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोरच्या फक्त मुलींच्या तुकडीनेही यावर्षी माऊंट एव्हरेस्ट सर केलं. एव्हरेस्ट सर करणाऱ्या या एनसीसी टीममध्ये एकूण दहा मुलींचा समावेश करण्यात आला होता.

 

 

एव्हरेस्ट पादाक्रांत करणारे महाराष्ट्र पोलिसातील मोहरे



 


संबंधित बातम्या :


 

पोलीस हवालदार रफिक शेखची 'एव्हरेस्ट'ला गवसणी


माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांसाठी मृतदेहच आहेत वाटाडे..


गिर्यारोहक आनंद बनसोडेच्या उपचारांची जबाबदारी सरकारने उचलली


एव्हरेस्टवीर आनंद विवाहबद्ध, धार्मिक विधींऐवजी संविधानाचं वाचन


नेपाळ भूकंप : भूमंडळ डळमळले, एव्हरेस्टची उंची घटली