श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यातल्या गुलशनपोरा भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तिन्ही दहशतवादी हिजबुलल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. उमर फय्याज लोन, आदिल बशीर मीर आणि फैजान भट अशी या तीन दहशतवाद्यांची नावं आहेत.

Continues below advertisement

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षाबलाने रविवारी दक्षिण काश्मीर भागातील गुलशनपोरा भागात नाकाबंदी केली होती. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यामुळे सुरक्षाबलाकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली होती.

शोधमोहिम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षाबलावर हल्ला केला. त्यानंतर जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे. काश्मीर झोनच्या पोलिसांनी सांगितले की, तिन्ही दहशतवादी याआधी अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते. हे दहशतवादी येथील नागरिकांवर अत्याचार करत होते. त्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

Continues below advertisement