श्रीनगर : पुलवामाच्या घटनेनंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना पळता भूई कमी झाली आहे. पाकिस्तान लष्कराच्या आश्रयाला अतिरेकी गेले आहेत. दहशतवादी त्यांची तळं प्रत्यक्ष ताबा रेषेपासून दूर नेऊ लागले आहेत. उरी हल्यानंतर संतापलेल्या भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता.


पुलवामा हल्यानंतर पाकिस्तान आणि दहशतावाद्याविरोधात भारत कडक कारवाई करणार असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची चांगलीच धास्ती लागली आहे. सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलवण्यात आल्याचे वृत्त आहे.

VIDEO | सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीरमधून अनेकांनी बस्तान हलवलं | एबीपी माझा



पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला पूर्णपणे स्वतंत्र्य दिले आहे.  पंतप्रधान  मोदी यांनी मोकळीक दिल्यानंर लष्करानेही या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भारताची तयारी पाहून पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण असल्याची माहिती आहे. त्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानने सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलवलं आहे.

काय झालं पुलवामात?


जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उरीमध्ये सप्टेंबर 2016 मधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. श्रीनगर-जम्मू हायवेवर अवंतीपोरा परिसरात सीआरपीएफच्या एका ताफ्याला लक्ष्य केलं. जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.


संबंधित बातम्या


Pulwama terror attack : दहशतवादावर हल्ला करुन नाही तर संवादातून मार्ग निघेल : नवज्योत सिंह सिद्धू


Pulwama terror attack : ना विसरणार, ना माफ करणार; पुलवामा हल्ल्यानंतर सीआरपीएफचं ट्वीट

Pulwama terror attack : 'त्या' शहीद जवानाची कॅन्सरग्रस्त आई अजूनही आपल्या मुलाची वाट पाहतेय

Pulwama terror attack : पत्नीला दोन महिन्यात परत येतो म्हणाला अन्...

Pulwama terror attack : देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं : शरद पवार 

Pulwama terror attack : सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यावर विकी कौशल म्हणतो... 

Pulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्य 

Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा! 

Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं

Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप

भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद