तिरुअनंतपूरम: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतात निवडणुका जिंकणं म्हणजे निवडणुका हारण्यासारखं असल्याचं सांगत पद्दुचेरी मधील काँग्रेस आघाडीचे सरकार केद्राने ठरवून पाडल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. ते केरळमध्ये बोलत होते. पद्दुचेरीतील काँग्रेस आघाडीचे सरकार नुकतंच पडलं आहे.
मोदी सरकार काही राज्यांतील सरकार ठरवून पाडत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पहिल्यांदाच कोणतेतरी केंद्र सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करुन आपली इच्छा न्यायालयांवर लादत असल्याचा आरोपही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच निवडणुका जिंकणं म्हणजे निवडणुका हारण्यासारख आहे, तसेच निवडणुका हारणं म्हणजे जिंकण्यासारखं आहे असं राहुल गांधीं म्हणाले.
केंद्र सरकार न्यायालयावर आपली इच्छा लादतंय
राहुल गांधी म्हणाले की, "दिल्लीमध्ये पहिल्यांदाच असं सरकार आलंय की जे आपल्या सत्तेचा गैरवापर करुन आपल्या इच्छा न्यायालयावर लादत आहे. न्यायपालिकेला जे करायचं आहे ते त्यांना करता येत नाही. केवळ इतकंच नाही तर विरोधी पक्षांना लोकसभा आणि राज्यसभेत आपला आवाज उठवू दिला नाही."
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पद्दुचेरीमध्ये सोमवारी फ्लोअर टेस्ट झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री नारायणस्वामी यांना आपलं बहुमत गमावलं आहे. काँगेसच्या पाच आणि डीएमकेच्या एका आमदाराने राजीनामा दिल्यानंतरल नारायणस्वामी सरकार अल्पमतात आलं होतं. 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँगेसने 16 जागा जिंकल्या होत्या. तर त्यांचा सहयोग पक्ष डीएमकेने चार जागा जिंकल्या होत्या. आता काँग्रेसच्या चार आमदारांना राजीनामा दिला आहे.