ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्यानं यामध्ये सुप्रियो किरकोळ जखमी झाले आहेत. तृणमुल कॉंग्रेसने हा हल्ला केल्याचा संशय सुप्रियो यांनी व्यक्त केला आहे.
आसनसोलमधील एका रॅलीमध्ये सुप्रीयो आले होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. यावेळी एक दगड सुप्रियो यांनाही लागला त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले.
त्यानंतर घटनास्थळी कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झडप झाली. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.
व्हिडीओ पाहा