Project Cheetah : तब्बल 70 वर्षांनी भारतात चित्ता परतणार आहे. प्रोजेक्ट चित्ताअंतर्गत नामिबियावरुन आठ चित्ते शनिवारी भारतात आणले जाणार आहेत. शनिवारी 17 सप्टेंबरला नामिबियावरुन आठ चित्त्यांची पहिली बॅच भारतात दाखल होईल. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा प्रोजेक्ट सुरु केला होता. मात्र हा पूर्ण होण्यामध्ये बरेच अडथळे आले. त्यानंतर आता 70 वर्षानंतर भारताच्या जमिनीवर चित्त्याचं पुनरागमन होणार आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं एक अधुरं स्वप्नच आता पंतप्रधान मोदी पूर्ण करणार आहेत असं म्हणावं लागेल. एकूण 16 चित्ते भारतात आणायचे आहेत, त्यापैकी 8 चित्य्यांची ही पहिली बॅच पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसांच्या दिवशी भारतात दाखल होणार आहे. 


चित्ता 'शाशा'ची पहिली झलक


उद्या विशेष विमानाने हे आठ चित्ते भारतात आणले जाणार आहेत. आम्ही तुम्हाला या चित्त्याची खास झलक दाखवणार आहोत. या आठ चित्त्यांमधील एक शाशा या चित्त्यांचा एक्सक्लूझिव्ह व्हिडीओ एबीपी माझाच्या प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. हा व्हिडीओ दक्षिण आफ्रिकेच्या नामिबियाच्या जंगलातील आहे. या व्हिडीओमध्ये 'शाशा' नावाची मादा चित्ता तुम्हाला पाहायला मिळेल.


पाहा व्हिडीओ : चित्त्याची पहिली झलक






नामिबियातून विमानाने भारतात येणार आठ चित्ते


नामिबियातून विशेष विमानाने हे आठ चित्ते उद्या भारतात दाखल होतील. यासाठी कार्गो फ्लाईट बोईंग 717 या विशेष विमानाची निवड करण्यात आली आहे. हे विमान नामिबियाहून थेट सुमारे 8000 किलोमीटरचं अंतर पार करत भारतात येईल. 






 


असा असेल चित्त्यांचा प्रवास?



  • नामिबियामधून सलग 16 तास प्रवास करु शकेल असं जंबोजेट यासाठी सज्ज आहे

  • प्रवासात चित्त्यांना उलट्या होतात, त्यामुळे त्यांना कमी त्रास व्हावा यासाठी हा प्रवास रात्रीचा करण्यात येणार आहे

  • प्रवासाआधी दोन तीन दिवस त्यांना काही खायला दिलं जात नाही, त्यामुळे प्रवास फार लांबू नये यासाठी इंधनासाठीही थांबायला लागू नये असं स्पेशल विमान सज्ज आहे

  • दुबईतल्या एका खासगी संस्थेचं हे विमान भारतात आधी जयपूरमध्ये येईल

  • तिथून नंतर हेलिकॉप्टरनं हे चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये रवाना केले जातील

  • मध्य प्रदेशात या चित्त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी स्वत: उपस्थित असतील.