नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनंतर काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच प्रियांका गांधी यांच्या नावाची मागणी पक्षात जोर धरत आहे. काँग्रेसच्या अनेक आजी-माजी नेत्यांचा प्रियांका यांच्या नावाला पाठिंबा आहे. प्रियांका गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी पक्षातील काही नेत्यांकडून होत आहे.
केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जैसवाल यांनीही प्रियांका गांधी यांनी पक्षाचं नेतृत्व करावं, यासाठी पाठिंबा दिला आहे. सध्या पक्षाची परिस्थिती पाहता पक्षाचं नेतृत्व एका खंबीर नेत्याकडे असणे आवश्यक आहे. पक्षाला प्रियंका गांधी यांच्यापेक्षा उत्कृष्ट पर्याय नसून या परिस्थितीतून बाहेर काढण्यास त्या मदत करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अनिल शास्त्री यांनीही ट्विटरवरुन प्रियंका गांधी यांना पाठिंबा दिला आहे. राहुल गांधी अध्यक्षपदाच्या राजीनामा दिल्याच्या निर्णयावर ठाम असल्याने पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. सध्या पक्ष महत्त्वाचा असून हा निर्णय लवकर घेतला पाहिजे. काँग्रेसकडे सध्या प्रियंका गांधींपेक्षा अधिक चांगला पर्याय नाही, असे त्यांनी आपल्या टिवट्मध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर नवीन पक्षाध्यक्ष कोण होणार यावर अजून निर्णय झालेला नाही. राहुल यांच्या राजीनाम्यानंतर अनेक आजी-माजी नेत्यांनी देखील राजीनामा दिला.
आगामी काळात गांधी परिवारातील व्यक्तीची निवड अध्यक्षपदी करु नये, असं राहुल गांधी यांनी यापूर्वीच सुचवलं होतं. तरी आजही पक्षात प्रियांका गांधी यांच्या नावाची मागणी जोर धरत आहे.राहुल गांधी यांचा राजीनामा अजून काँग्रेस पक्षातर्फे स्वीकारण्यात आलेला नाही.
ओदिशा येथील काँग्रेसचे नेते भक्त चरण दास म्हणाले, राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर अनेक व्यक्तींचा अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधी यांना पसंती आहे. आता आगामी काळात काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधींना पक्षातील नेत्यांचा पाठिंबा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2019 01:28 PM (IST)
काँग्रेस अध्यक्ष पदासाठी प्रियांका गांधी यांच्या नावाची मागणी पक्षांतगर्त होत आहे. पक्षातील अनेक आजी माजी नेत्यांनी ही मागणी केली आहे. पक्षातील नेत्यांनी टिवट् करून प्रियंका गांधींच्या नावाला पाठींबा दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -