प्रयागराज : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा आज प्रयागराजच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या प्रवासादरम्यान, दुपारी त्या अरेल घाटावरुन संगमात पवित्र स्नान करण्यासाठी रवाना झाल्या होत्या. त्यांच्यासमवेत त्यांची मुलगी मिराया आणि इतर काही लोक होते. प्रियंका गांधी बोटीवरुन संगमला जात असताना, योगी सरकार त्यावेळी हेलिकॉप्टरमार्गे माघ जत्रेत उपस्थित यात्रेकरूंवर फुलांचा वर्षाव करीत होते. प्रियंका गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या लोकांवरही या फुलांचा वर्षाव झाला.
फुलांचा हा पाऊस केवळ एकट्या प्रियंकासाठीच नाही तर आज मौनी अमावस्यानिमित्त माघ जत्रेत आलेल्या लाखो भाविकांसाठी करण्यात आला आहे. ज्यावेळी हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होत होता, त्यावेळी प्रियंका आणि तिच्याबरोबर उपस्थित असलेले लोक हेलिकॉप्टरला बोटीवर बसून पहात होते.
उत्तर प्रदेशात मौनी अमावस्यानिमित्त श्रद्धाळू पवित्र स्नान करत आहेत. गुरुवारी सकाळपासूनच पवित्र नद्यांच्या काठावर भाविकांची गर्दी वाढली आहे. संगम शहर प्रयागराज असो, बाबा विश्वनाथ यांची नगरी काशी किंवा भगवान श्री रामांची अयोध्या असो, सर्वत्र भक्त मोठ्या संख्येने पोहोचून स्नानासोबत दान करत आहेत. मौनी अमावस्यानिमित्त राज्य सरकारने प्रयागराजमधील संगमसमवेत माघ मेळा साइटवर हेलिकॉप्टरद्वारे भाविकांवर पुष्पवृष्टी केली आहे. गुरुवारी, लोक मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील नद्यांच्या काठावरील घाटांवर पवित्र स्नान करीत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी पवित्र स्थान केलं आहे.