नवी दिल्ली : खाजगी रेल्वे चालकांना हव्या त्या स्टेशनवर थांबवण्याचे स्वांतंत्र्य देण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरने प्रसिद्ध केली आहे. देशात 150 खाजगी रेल्वे गाड्या देशभरातील 109 मार्गांवर चालवण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी खासगी ऑपरेटर्सना प्रवासाआधी रेल्वेमार्गावरील थांब्यांची यादी सादर करावी लागणार आहे.

खाजगी रेल्वे चालकांना रेल्वे स्थानकांवर थांबण्याची वेळ आणि निघण्याची वेळही सांगावी लागणार आहे. किमान वर्षभरासाठीचं प्लॅनिंग रेल्वे प्रशासनाला द्यावं लागणार आहे. तशा प्रकारचा अहवाल खाजगी रेल्वे गाड्यांना सादर करावा लागणार आहे. सवलतीच्या कराराच्या अटी व शर्तींच्या अनुषंगाने थांबे/थांब्यांचे निर्णय घेण्यास खाजगी रेल्वे प्रशासनाला स्वातंत्र्य देण्यात आले आहे. रेल्वेने अर्ज-पूर्व बैठकीस उपस्थित असलेल्या एका खाजगी रेल्वे प्रतिनिधीच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

जलदगती रेल्वे गाड्यांवर परिणाम होणार नाही
रेल्वेने असेही म्हटले आहे, की खाजगी गाड्यांच्या अशा प्रकारच्या थांब्यांची संख्या त्या मार्गावर कार्यरत असलेल्या रेल्वेच्या जलदगती रेल्वे गाड्यांच्या थांब्यांपेक्षा जास्त असणार नाहीत. खासगी ऑपरेटरने सादर केलेल्या रेल्वे ऑपरेशन योजनेत ज्या स्थानकांवर गाड्यांमधील पाण्याची टाकी भरण्याची गरज तसेच रेल्वे स्थानक, वॉशिंग लाईन्स किंवा स्टॅबलिंग लाईन्स, ट्रेनची स्वच्छतागृहांचा देखील समावेश आहे.

आता खाजगी रेल्वे धावणार
केंद्र सरकार देशातील प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी खाजगी कंपन्यांसोबत भागिदारी करण्याची योजना आखत आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी अर्ज मागवले आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील रेल्वेचं नेटवर्क जवळपास 12 क्लस्टरमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये 109 अप अँड डाऊन खाजगी रेल्वे मार्गावर 151 मॉडर्न रेल्वे चालवण्याचा विचार आहे. या योजनेंतर्गत 30 हजार कोटी रुपयांची खाजगी क्षेत्राची गुंतवणूक असेल.

अटी आणि शर्थी

  • रेल्वे गाडीतील वातानुकूलित डबे हे मेक इन इंडिया असले पाहिजे.

  • रेल्वे 35 वर्षांसाठी हा प्रोजेक्ट खाजगी कंपन्यांना देईल.

  • रेल्वे विभागाकडून या प्रवासी रेल्वे चालवण्यासाठी ड्रायव्हर आणि गार्ड देण्यात येतील.

  • इतर सर्व व्यवस्था खाजगी कंपन्यांना करावी लागेल. यामध्ये रेल्वे इंजिन देखभाल, दुरुस्ती यांचा समावेश असेल.


BJP-Facebook Relations | भाजप नेत्यांवर फेसबुकची कारवाई नाही, वॉल स्ट्रीट जर्नलचा खळबळजनक दावा