नवी दिल्ली : सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियावर प्रचारास बंदी घालण्यत यावी, अशी सूचना निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला केली असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीत मतदानाच्या 48 तासाआधी उमेदवारांना प्रचारास बंदी असते. त्याचप्रकारे या माध्यमांवरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या काळात सेक्शन 126 नुसार, 48 तासांपूर्वी जाहीर सभा, रॅलीच्या माध्यमाने प्रचार करण्यास मनाई असते. मात्र उमेदवाराकडून प्रिंट मीडिया, सोशल मीडियावर जाहिराती देऊन प्रचार केला जातो. त्यामुळे निवडणूक आयोगाने विधी मंत्रालयाला याबाबत पत्र पाठवले आहे. शिवाय लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असंही पत्रात म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रावर विधी मंत्रालयाने अजुन तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचं कळतंय. लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. आगामी दोन महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशात निवडणूक आयोगाच्या सल्ल्यावर तात्काळ अंमलबजावणी शक्य नसल्याची बोललं जात आहे.
पुढील आठवड्यात संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सूचनेची दखल घेणं अद्यापतरी शक्य नाही.
मतदानाच्या दोन दिवसआधी प्रिंट, सोशल मीडियावर प्रचारास बंदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2019 04:21 PM (IST)
निवडणुकीत मतदानाच्या 48 तासाआधी उमेदवारांना प्रचारास बंदी असते. त्याचप्रकारे या माध्यमांवरही बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -