नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री 8.45 वाजता देशाला संबोधित करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी आज जनतेशी काय संवाद साधणार, देशातील कोरानाच्या गंभीर स्थितीबद्दल काही मोठी घोषणा करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस उत्पादकांशी बैठक घेतली. या दरम्यान ते म्हणाले की लसी उत्पादकांनी विक्रमी वेळेत कोविड 19 ची लस तयार केली. जगभरात निर्माण झालेल्ये लसींपैकी सर्वात स्वस्त लस भारताची आहे. तसेच जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम देखील भारतात सुरू आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सकाळच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या दोन लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1761 रुग्णांचा मृत्यू झाला असून हे एका दिवसातील सर्वाधिक मृत्यू आहेत. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संखेत वाढ होऊन 20 लाख 31 हजार 977 एवढी झाली आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 53 लाख 21 हजार 089
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 31 लाख 08 हजार 582
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 20 लाख 31 हजार 977
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 80 हजार 530
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 12 कोटी 71 लाख 29 हजार 113 डोस