PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज 1 लाख 25 हजार पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे (PM Kisan Samridhi Kendras) लोकार्पण करणार आहेत. केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने देशातील किरकोळ खत विक्री केंद्रांचे रुपांतर पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांमध्ये करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राजस्थानातील सीकर येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून विविध उपक्रमांचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण देखील करणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते पंतप्रधान किसान निधी योजनेचा 14 वा हप्ता वितरीत करणार आहेत.    


शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांची स्थापना


दरम्यान, आज 1 लाख 25 हजार पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.   ही केंद्रे शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करतील आणि शेतकऱ्यांना कृषीविषयक साहित्य (खते,बियाणे, अवजारे), मृदा, बियाणे आणि खते यांच्या तपासणीची सुविधा पुरवतील. तसेच ही केंद्रे सरकारच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतील. ब्लॉक, जिल्हा पातळीवरील दुकानांमध्ये नियमित किरकोळ विक्रीची क्षमता उभारणी सुनिश्चित करणार आहेत. सीकर इथं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालय यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधानांसह केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा, केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालय सचिव रजत कुमार मिश्रा आणि स्थानिक खासदार, आमदारांसह विविध मान्यवर उपस्थित असणार आहेत.


देशभरातील 2 कोटी शेतकरी ऑनलाईनच्या माध्यमातून कार्यक्रमाला उपस्थित राहणार


राजस्थानातून तसेच देशभरातून प्रत्यक्ष आणि आभासी उपस्थितीच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी शेतकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं या कार्यक्रमाला संमेलनाचे स्वरुप येणार आहे.  विशेष म्हणजे, देशभरातील 732 कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीकेएस),75 आयसीएआर संस्था, 75 राज्य कृषी विद्यापीठे, 600 पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रे, 5000 प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि 4 लाख सामान्य सेवा केंद्रांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान या कार्यक्रमात सव्वा लाख पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण करणार आहेत. केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने देशातील किरकोळ खत विक्री केंद्रांचे रुपांतर पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांमध्ये करत आहे. ही केंद्रे शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करणार आहेत.


पाच वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन, 7 वैद्यकीय महाविद्यालयांसाठी पायाभरणी


पंतप्रधान राजस्थानमधील धौलपूर, चित्तोडगड, सिरोही, श्री गंगानगर आणि सीकर इथे उभारण्यात आलेल्या पाच वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आज करणार आहेत. तसेच राज्यात आणखी सात वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी केली जाणार आहे. याचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते आज होमार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


PM Kisan Yojana : PM किसानचा 14 वा हप्ता आज शेतकऱ्यांना मिळणार, राजस्थानमधून पंतप्रधानांच्या हस्ते वितरण होणार