Nepal PM India Visit: नेपाळचे (Nepal) पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड (PM Pushpa Kamal Dahal Prachanda) सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. आज म्हणजेच, गुरुवारी पुष्पकमल दहल प्रचंड पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशांमधील ऊर्जा, कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला चालना देण्यावर चर्चा होणार आहे. बुधवारी नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये भारत-नेपाळ संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. या बैठकीला परराष्ट्र सचिव विनय क्वात्राही उपस्थित होते.
डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर प्रचंड यांचा हा पहिला द्विपक्षीय विदेश दौरा आहे. नेपाळच्या पंतप्रधानांनी बुधवारी नेपाळी दूतावासातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं की, "आम्ही दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहोत." वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, प्रचंड यांच्या शिष्टमंडळाचा भाग असलेले नेपाळचे परराष्ट्र मंत्री एनपी सौद यांनी सांगितलं की, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या द्विपक्षीय चर्चेत व्यापार, कनेक्टिव्हिटी आणि सीमा समस्यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
दोन्ही पंतप्रधान लँड पोर्टचं उद्घाटन करतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे समकक्ष पुष्कमल दहल 'प्रचंड' गुरुवारी भारत-नेपाळ सीमेवर बहराइच येथे उत्तर प्रदेशच्या पहिल्या लँड पोर्टचं उद्घाटन करतील. वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लँड पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियानं रुपॅडिहा लँड पोर्टवर सल्लागार म्हणून नियुक्त केलेले एपी सिंह यांनी बुधवारी बोलताना सांगितलं की, पंतप्रधान नवी दिल्ली येथून सकाळी 11.30 वाजता सुविधेचे उद्घाटन करतील. दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्घाटनाच्या तयारीला अंतिम स्वरूप दिलं आहे.
प्रचंड यापूर्वीही भारत दौऱ्यावर आलेले
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तत्कालीन नेपाळी पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्या भारत भेटीदरम्यान नेपाळमध्ये रुपे कार्ड ( RuPay Card) लाँच करण्यात आलं होतं. दरम्यान, पंतप्रधान प्रचंड हे यापूर्वीही दोनदा भारत दौऱ्यावर आले आहेत. 2016 मध्ये आणि 2008 मध्ये नेपाळचे पंतप्रधान म्हणून त्यांनी भारताला भेट दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :