PM Modi Speech LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह :  कोरोनाच्या दुसरे लाटेमुळे देशापुढे मोठे संकट : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री 8.45 वाजता देशाला संबोधित करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केले आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Apr 2021 08:38 PM
मजुरांनी जिथे आहे, तिथेच थांबावे; स्थलांतर करू नये :मोदी

श्रमिकांनाही तातडीने लस मिळेल अशी व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मजुरांनी जिथे आहे, तिथेच थांबावे. स्थलांतर करू नये. अर्थचक्र आणि उद्योग विश्व सुरू राहील याची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे  : मोदी

आजपर्यंत १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण : मोदी

आजपर्यंत १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोना योद्धा आणि बहुतांश आरोग्य कर्मचाऱ्यांचे  लसीकरण पूर्ण झाले आहे. 

गेल्यावेळी आपल्याकडे कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य सुविधा नव्हती, ती परिस्थिती आज नाही- मोदी

गेल्यावेळी आपल्याकडे कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशी आरोग्य सुविधा नव्हती, ती परिस्थिती आज नाही, कमी वेळेत यामध्ये आपण मोठा सुधार केला आहे- मोदी

भारताने जगातील सर्वात स्वस्त लस तयार केली - मोदी

भारताकडे प्रचंड मोठी फार्मा इंडस्ट्री आहे. औषधांचं उत्पादन वाढवण्यास संपूर्ण सहकार्य केलं जातयं. भारताने जगातील सर्वात स्वस्त लस तयार केली आहे. 

जगातील सर्वात स्वस्त लस भारताकडे आहे, खासगी क्षेत्राने मोठं काम केलं आहे- मोदी

भारतात दोन लसींची निर्मिती होत आहे, जगातील सर्वात स्वस्त लस भारताकडे आहे, खासगी क्षेत्राने मोठं काम केलं आहे- मोदी

रुग्णालयात बेडची संख्या वाढवली जातेय, कोविड सेंटर्स उभारले जात आहेत- मोदी

रुग्णालयात बेडची संख्या वाढवली जातेय, कोविड सेंटर्स उभारले जात आहेत- मोदी

कठीण काळातही धीर सोडू नका : मोदी

 कोरोनात जीव गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली, कठीण काळातही धीर सोडू नका. देशभरात सध्या ऑक्सिजन मागणी वाढली आहे : मोदी

गरजूंना ऑक्सिजन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत- मोदी

गरजूंना ऑक्सिजन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत- मोदी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश संकटात आहे, आपण संयम पाळला पाहिजे, या संकटातून बाहेर आलं पाहिजे- मोदी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश संकटात आहे, आपण संयम पाळला पाहिजे, या संकटातून बाहेर आलं पाहिजे- मोदी

 कोरोनाच्या दुसरे लाटेमुळे देशापुढे मोठे संकट : पंतप्रधान मोदी

 कोरोनाच्या दुसरे लाटेमुळे देशापुढे मोठे संकट : पंतप्रधान मोदी

Covid Vaccination :

जगभरात निर्माण झालेल्ये लसींपैकी सर्वात स्वस्त लस भारताची आहे. तसेच जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम देखील भारतात सुरू आहे.

PM Modi Live :

या घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस उत्पादकांशी बैठक घेतली. या दरम्यान ते म्हणाले की लसी उत्पादकांनी विक्रमी वेळेत कोविड 19 ची लस तयार केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री 8.45 वाजता देशाला संबोधित करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केले आहे.

पार्श्वभूमी

नवी दिल्ली: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशाला संबोधित करणार आहेत. आज रात्री 8.45 वाजता देशाला संबोधित करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी आज जनतेशी काय संवाद साधणार, देशातील कोरानाच्या गंभीर स्थितीबद्दल काही मोठी घोषणा करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.