Ashadhi Ekadashi Mahapooja :आषाढी एकादशी महापूजा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे मंदिरात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशातील जनेला संबोधित करणार आहेत. पीएमओ ट्विटर हॅन्डलवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली. अशातच मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्षं लागलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jul 2020 03:14 AM
आषाढी एकादशी महापूजा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे मंदिरात दाखल
आषाढी एकादशी महापूजा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे मंदिरात दाखल
दिवाळीपर्यंत पंतप्रधान गरीब योजना सुरु राहणार आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत गरिबांना धान्य मोफत देण्याचा निर्णय- पंतप्रधान नरेंद्र मोदी
आषाढी एकादशी महापूजा : विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला सुरुवात
देशाच्या 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य दिलं जाणार, दर महिन्याला पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ मोफत दिले जातील, सोबतच प्रत्येक परिवाराला दर महिन्याला एक किलो डाळ मोफत दिली जाणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अनलॉक 1 सुरु झाल्यापासून बेजबाबदारपणा वाढला आहे. पूर्वी मास्क, हात धुण्याबद्दल सतर्क होतो, आता नाहीत : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरण्याच प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहे. पंतप्रधान मोी यांनी देशाल सांगावं की चीनच्या सैन्याना भारतातून मागे कधी आणि कसं पाठवणार? देशात न्याय योजना लागू करण्याचा आणि गरीब नागरिकांना खात्यात साडेसात हजार रुपये देण्याचा सल्ला दिला. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.

पावसाळ्यात लोकांनी विशेष खबरदारी घ्यावी, या काळात सर्दी, ताप, खोकला वाढण्याची शक्यता - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी अनेकदा देशाला संबोधित केलं आहे. याआधी सर्वात पहिल्यांदा मोदींनी 19 मार्च रोजी देशात 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानंतर 24 मार्च रोजी देशात लॉकडाऊन लवण्याची घोषणा केली होती. सर्वात आधी लॉकडाऊन 25 मार्चपासून ते 14 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आला होता. आता रविवारी 28 जून रोजी मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमामधून देशाला संबोधित केलं होतं. त्यानंतर ठिक एक दिवसानंतर ते पुन्हा राष्ट्राला संबोधित करणार आहेत. अशातच पंतप्रधान काय घोषणा करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
देशाला संबोधित करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये एक बैठक बोलावली आहे. ही बैठक देशातील पहिल्या कोरोना व्हायरसच्या लसीच्या तयारीबाबत जाणून घेण्यासाठी बोलावण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी एक ट्वीट केलं असून त्यातून त्यांनी जनतेला मोदींचं संबोधन ऐकण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधानांच्या संबोधनाआधी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल भारत सरकारच्या वतीने उचलण्यात आलं आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी सरकारच्या वतीने 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउजर यांसारख्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय चिनी अॅप्सचा समावेश आहे. आयटी अॅक्ट 2000 अंतर्गत या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. परंतु, अद्याप मोदी आज बोलताना कोणत्या विषयावर जनतेला संबोधित करणार, हे समजलेलं नाही. परंतु, असं म्हटलं जात आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ते विविध मुद्द्यांवर जनतेशी संवाद साधतील. याव्यतिरिक्त असा अंदाज बांधण्यात येत आहे की, सध्या भारत-चीन यांच्यातील वाढत्या तणावांबाबतही पंतप्रधान काही गोष्टी स्पष्ट करू शकतात.


 


पीएमओ इंडियाच्या ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करू देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत.


 


पंतप्रधानांच्या संबोधनाआधी एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल भारत सरकारच्या वतीने उचलण्यात आलं आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी सरकारच्या वतीने 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउजर यांसारख्या अनेक मोठ्या आणि लोकप्रिय चिनी अॅप्सचा समावेश आहे. आयटी अॅक्ट 2000 अंतर्गत या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.