नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध अमेरिकेला पुरवल्याबाबत आभार मानले आहेत. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केलं. भारत असा देश आहे की, कोरोनाचं संकट असतानाही इतर देशांना मदतीचा हात देत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर नजर टाकल्यास अमेरिकेसाठी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी किती महत्वाचे आहेत हे कळतं. कारण व्हाईट हाऊस ट्विटरवर ज्यांना फॉलो करतं त्यामध्ये अमेरिकेतील नेते वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक एकमेव नेते आहेत.


व्हाईट हाऊस एकूण 19 ट्विटर हँडलला फॉलो करतं. ज्यामधील चार ट्विटर हँडल भारताशी निगडीत आहेत, तर उर्वरित 15 अमेरिकेतील आहेत. या चार ट्विटर हँडलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर हँडल, प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया ऑफिशियल, पीएमओ ऑफिस आणि अमेरिकेतील भारताचे दूतावास यांचा समावेश आहे. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलवरुन फॉलो केले जाणारे एकमेव राजकीय नेते आहेत.



अलिकडच्या काळात कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताने अमेरिका आणि ब्रिटनसारख्या बलाढ्या देशांना मदतीचा हात दिला आहे. त्यानंतर तेथील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल बरंच कौतुक केलं. त्यानंतर आता व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलची फॉलो लिस्ट पाहिल्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे.


Donald Trump यांचा सूर बदलला; हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर पंतप्रधान मोदींचे आभार मानले!



मात्र व्हाईट हाऊस पंतप्रधान नरेंद्र मोदींना आधीपासून ट्विटरवर फॉलो करतंय की आता करायला लागलं आहे, हे मात्र कळू शकलेलं नाही. मात्र या लिस्टमध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेव नेते आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही. त्यामुळे नवी दिल्ली आणि वॉशिग्टनचं नातं किती घट्ट आहे, याचा अंदाज जगाला येऊ शकेल.


अमेरिकेसाठी भारत आणि मोदी महत्त्वाचं का आहे? भारत वेगाने विकसित होत असलेल्या देश आहे आणि भारताची ही प्रगती कुणी नाकारु शकत नाही. एवढ्या मोठ्या देशाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिकेपासून लपून राहिलेली नाही, गेल्या सहा वर्षात अमेरिकेच्याही ती निदर्शनात आली असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेतील दौरेही खास होते. तिथे त्यांना मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसादही त्यांची लोकप्रियता सांगायला पुरेसा आहे. याच सगळ्या गोष्टी भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतर देशांपेक्षा आणि नेत्यांपेक्षा वेगळं करतात.


संबंधित बातम्या :