पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदललं!
एबीपी माझा वेब टीम | 21 Sep 2016 05:33 PM (IST)
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदण्यात आलं आहे. ‘7, रेसकोर्स रोड’ऐवजी आता ‘7, लोककल्याण मार्ग’ असं नामकरण करण्यात आलं आहे. भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी एनडीएमसी अर्थात नवी दिल्ली नगर परिषदेकडे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला एनडीएमसीने मंजुरी दिली. त्यामुळे पंतप्रधानांचं निवासस्थान आता ‘7, आरसीआर’ ऐवजी ‘7, लोककल्याण मार्ग’म्हणून ओळखलं जाईल. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी आणि एकात्मतेच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या रस्त्याचं नाव बदलावं. तसंच ‘7 रेसकोर्स रोड’ हे सध्या अस्तित्वात असलेलं नाव भारतीय संस्कृतीशी सुसंगत नाही. मात्र नाव बदलल्यास प्रत्येक पंतप्रधानाची नाळ समाजातील शेवटच्या व्यक्तीशी जोडली जाईल, असं मत लेखी यांनी मांडलं होतं.