समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील असीमानंदला जामीन मंजूर
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2016 09:39 AM (IST)
नवी दिल्ली: समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असीमानंद याला पंचकुला एनआयए कार्टाने जामीन मंजूर केला आहे. NIA च्या न्यायालायात या प्रकरणी सुनावणीनंतर त्याची जामीन मंजूर करण्यात आला. 18 फेब्रुवारी 2007 रोजी दिल्ली-लाहोर समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा असीमानंद याच्यावर आरोप आहे. या स्फोटात 68 जणांचा मृत्यू झाला असून, यातील बहुतेक जण पाकिस्तानचे रहिवाशी होते. समझौता एक्सप्रेसच्या दोन रेल्वे डब्यांमध्ये सूटकेसमधून बॉम्ब ठेवण्यात आले होते.