अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 66वा वाढदिवस आहे. मोदी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा करणार आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी मोदींनी गांधीनगरमधील रायसण इथं जाऊन आई हिराबा यांचा आर्शिवाद घेतला.


दुसरीकडे सूरतमध्ये पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 1 टनापेक्षा जास्त वजनाचा आणि जगातला सर्वात उंच केक तयार करण्यात आला आहे. पिरॅमिडच्या आकाराचा हा केक असणार आहे. अतुल बेकरी, शक्ती फाऊंडेशन एनजीओ आणि गिटार मॉन्क यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. हा केक कापल्यानंतर त्याचं वाटप 10 हजार दिव्यांगांमध्ये करण्यात येणार आहे.

दरम्यान, आज सकाळी 11 वाजता लिमखेडा इथं वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत अनेक योजनांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे. तर दुपारी 2 वाजताच्या सुमारास नवसारीत मोदींच्याच हस्ते 11 हजार 200 दिव्यांगांना वेगवेगळ्या उपकरणांचं वाटप केलं जाणार आहे. तर 2200 जणांना श्रवणयंत्र आणि 1200 व्हील चेअर वाटप करण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींची आजवरच्या कारकीर्दीवर एक नजर:

- नरेंद्र दामोदारदास मोदी (पंतप्रधान)
17 सप्टेंबर 1950 रोजी नरेंद्र मोदींचा जन्म

गुजरातच्या वडनगरमध्ये मोदींचा जन्म

पंतप्रधान मोदींच्या आईचं नाव हिराबेन मोदी.

नरेंद्र मोदी लहानपणी वडनगरच्या रेल्वे स्टेशनवर चहा विक्री करायचे.

वयाच्या आठव्या वर्षी आरएसएसमध्ये प्रवेश केला.

मोदी आरएसएसचे प्रचारकही होते.

भाजपचे महासचिव होते.

7 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.

26 मे 2014 पासून ते पंतप्रधान पदी विराजमान आहेत.

सध्या ते उत्तरप्रदेशमधील वाराणसीचे खासदार आहेत.