नवी दिल्ली : विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असणार हे आज निश्चित होणार आहे. यासाठी 17 विरोधी पक्षांची आज बैठक पार पडणार आहे.


एनडीएकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मात्र काँग्रेसने कोविंद यांना पाठिंबा देण्यास नकार दिला असून काँग्रेस स्वतंत्र उमेदवार राष्ट्रपती निवडणुकीत उतरवणार आहे.

एनडीएचे राष्ट्रपतीपाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे दलित असल्याने काँग्रेसही दलित उमेदवारच पुढे करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांची नावं चर्चेत आहेत.

त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून आज कोणाच्या नावाची घोषणा होणार याकडेच सर्वांच लक्ष आहे.

दरम्यान जेडीयू, शिवसेनेनेही रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिल्याने यूपीएच्या उमेदवाराला बहुमत मिळणार का हाच प्रश्न आहे.