Prashant Kishor: बिहार विधानसभा निवडणुकीचे दुष्परिणाम आता राजकीय पक्षांमध्ये दिसून येत आहेत. बिहार निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरी थेट रामायण घडले. ज्या मुलीनं किडनी दिली त्या रोहिणी आचार्य यांनी थेट घरावर तुळशीपत्र ठेवले. तेजस्वी यादव आणि रोहिणी यांच्यात जोरदार वाद झाल्याची चर्चा रंगली. यानंतर आता प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षातही भूकंप झाला आहे. गेल्या तीन वर्षांपसून बिहारी भूमीत संघर्ष करूनही प्रशांत किशोर यांची घोर निराशा झाली. पदराने एक जागा दूरच, पण 99 टक्के उमेदावारांना अनामत रक्कमही वाचवात आली नाही. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून यश मिळवलं असलं, तरी पहिल्या निवडणुकीत त्यांना दरुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी स्वत: मैदानातून पळ काढल्याने पक्षाच्या वाटचालीवर विपरित परिणाम झाला.
प्रशांत किशोरांच्या पक्षाने सर्व समित्या बरखास्त केल्या
आता निवडणुकीनंतर जन सूरजने पंचायतीपासून ते राज्य पातळीपर्यंत सर्व समित्या बरखास्त केल्या आहेत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, सर्व समित्या तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आल्या आहेत आणि पुढील दीड महिन्यात संघटना पुन्हा बांधली जाईल. पक्षाचे प्रवक्ते सय्यद मसिहुद्दीन यांनी सांगितले की, शनिवारी पाटणा येथे झालेल्या जन सूरज राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्षांच्या अनुपस्थितीत, प्रदेशाध्यक्ष मनोज भारती यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. पक्षाचे समन्वयक प्रशांत किशोर देखील उपस्थित होते. पक्षाच्या निर्णयानुसार, बरखास्त समित्या नवीन संघटना स्थापन होईपर्यंत त्यांचे काम सुरू ठेवतील.
भविष्यातील रोडमॅपबाबत चर्चा केली जाईल
पक्षाने आपल्या वरिष्ठ नेत्यांना राज्यातील सर्व 12 विभागांची जबाबदारी सोपवली आहे, जे त्यांच्या अधिकारक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये एक नवीन, प्रभावी आणि कार्यक्षम संघटनात्मक रचना तयार करतील. त्यांनी माहिती दिली की 21 डिसेंबर रोजी पाटणा येथे पक्षाच्या महासभेची बैठक बोलावण्यात आली आहे, जिथे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व प्रमुख जिल्ह्यातील नेत्यांकडून निवडणूक आणि संघटनेशी संबंधित त्यांचे अनुभव सविस्तर ऐकतील आणि आगामी निवडणुकांसाठी नवीन रोडमॅप तयार करण्याबाबत त्यांच्याशी सखोल चर्चा करतील.
जन सूरजने एकट्याने निवडणूक लढवली
भारताचे माजी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एसके सिंह, माजी केंद्रीय मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह आणि ज्येष्ठ वकील वायव्ही गिरी हे देखील या बैठकीला उपस्थित राहतील. बिहार निवडणुकीत जन सूरज यांना एकही जागा मिळाली नाही. प्रशांत किशोर यांच्या पक्षाने ही निवडणूक कोणत्याही युतीशिवाय एकट्याने लढवली होती.
इतर महत्वाच्या बातम्या