मुंबई: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये (Johannesburg) सुरू असलेल्या G20 परिषदेत (G20 Summit) सहभागी झाले आहेत. मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलॉनी (Giorgia Meloni) यांची भेट घेतली. या G20 परिषदेत भारताने विशेषतः मादक पदार्थ-दहशतवाद (drug-terrorism) आणि आरोग्याशी संबंधित आपत्तींवर (health emergencies) एकत्रितपणे काम करण्यासाठी ग्लोबल हेल्थकेअर रिस्पॉन्स टीम (Global Healthcare Response Team) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

G20 समिटमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी स्वागत केले. समिटच्या पहिल्या सत्रात ‘सस्टेनेबल ग्रोथ’ आणि सर्वांचा समावेश हे केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी भाषणात सांगितले.

G20 Summit 2025 : बहुपक्षीय चर्चा

मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोन्ही देशांमध्ये वाढत्या भागीदारीची गरज आणि अनेक क्षेत्रांमध्ये संयुक्त उपायांची रूपरेषा यावर चर्चा झाली. या समिट दरम्यान ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लूला दि सिल्वा यांच्याशीही अनौपचारिक चर्चासत्र झाले.

India’s ProposalG20 Summit 2025 : ग्लोबल हेल्थकेअर रिस्पॉन्स टीमचा प्रस्ताव

भारताने मादक पदार्थ-दहशतवाद याच्याशी लढण्यासाठी नवीन प्रस्ताव मांडला आहे. याशिवाय, भारताने ग्लोबल हेल्थकेअर रिस्पॉन्स टीम स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामाध्यमातून आरोग्य आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात तत्परपणे हस्तक्षेप करता येऊ शकेल.

G20 सारख्या जागतिक व्यासपीठावर भारताने आपली सभ्यतामूल्ये, विशेषतः ‘इंटीग्रल ह्युमॅनिझम’ या तत्त्वावर आधारित धोरणे पुढे आणली आहेत. या माध्यमातून भारताने विविध देशांमध्ये सामंजस्य वाढवण्याचा, सर्वसमावेशक विकास साधण्याचा मार्ग दाखविला आहे.