पणजी : मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे प्रमोद सावंत विराजमान होण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. प्रमोद सावंत साखळी मतदारसंघाचे आमदार असून ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.


गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेसाठी सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षातील आमदारांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकीत प्रमोद सावंत यांच्या नावावर चर्चा झाल्याचं समजतं. भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे. पण महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने नेत्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र आज दुपारी सत्ताधारी भाजप आपल्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करु शकतं.

VIDEO | मनोहर पर्रिकरांना समर्थन होतं, भाजपला नाही : विजय सरदेसाई | गोवा | एबीपी माझा



मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात सत्तेसाठी संघर्ष सुरु झाला आहे. एकीकडे मोठा पक्ष म्हणून काँग्रेसने राज्यपालांना पत्र लिहून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारीच गोव्यात दाखल झाले असून त्यांनी युती सरकारच्या आमदारांसोबत बैठक घेतली. सुमारे सहा तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मात्र आता गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांची नवे मुख्यमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.

VIDEO | गोव्यात राजकीय हालचालींना वेग, दिगंबर कामत यांची प्रतिक्रिया | एबीपी माझा



मनोहर पर्रिकरांचं निधन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (17) रात्री स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झालं. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशाने प्रामाणिक, मनमिळावू आणि सर्वार्थाने मोठा नेता गमावल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. पर्रिकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे आज दिल्लीसह इतर सर्व राज्यातील राजधानीमध्ये तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. तर गोव्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीन गडकरी गोव्यात दाखल

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर, मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर संध्याकाळी 5 वाजता होणार अंत्यंसस्कार

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा मनोहर पर्रिकरांनी सुचवलं

'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय

लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय  

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने शोककळा, लढवय्या नेत्याला मान्यवरांकडून श्रद्धांजली