Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अनेक नेत्यांनी आपली भूमिका मांडली. तर काही दिवसांनंतर आपला निर्णय देत ते शरद पवारांसोबत तर काही अजित पवारांसोबत गेले. या सर्व घटना घडल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे तुरूंगात होते. त्यांनी बाहेर आल्यानंतर देखील एक- दोन दिवस अधिवेशनाला हजेरी लावली. मात्र महायुतीतील नेत्यांनी पुन्हा त्यांच्यावर टीका केल्याने ते नेमके कोणासोबत आहेत ते स्पष्ट झालेलं नव्हतं. मात्र, आज त्यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) यांच्यासोबत आहेत ते त्यांच्या कृतीच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यावर पत्रातील नेते आणि खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Praful Patels reaction after navab Malik use ncp symbol watch on his social media)


काय म्हणाले प्रफुल पटेल?


नवाब मलिक हे आधीपासूनच आमचे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांनी घड्याळाचे चिन्ह वापरने काही आश्चर्याची गोष्ट नाही. नवाब मलिक (Nawab Malik) हे आधीपासूनच आमचे सहकारी आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे त्यांनी घड्याळ चिन्हाचे वापर करणे काही आश्चर्याची गोष्ट नाही असं प्रफुल पटेलांनी (Praful Patel) म्हटलं आहे. 


 नवाब मलिक यांनी प्रोफाईलमध्ये घड्याळ वापरण्यास केली सुरूवात 


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक  (Nawab Malik) नक्की कोणाबरोबर यावर आज अखेर स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शिक्कामोर्तब झाले आहे.  तब्यतेच्या  कारणावरून अतंरीम जामीनावर बाहेर असलेले नवाब मलिकांचा पाठींबा अजित पवारांच्या  राष्ट्रवादी काँग्रेस पाठींबा असल्याचे जाहीर केले आहे. नवाब मलिक यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्रोफाईलमध्ये घड्याळ वापरण्यास सुरूवात केली आहे.


नवाब मलिक  (Nawab Malik) हे सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. तर आतापर्यंत त्यांनी आपण राष्ट्रवादीच्या दोन्ही गटापैकी कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नव्हती. दरम्यान, मागील 6 महिन्यांपासून नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह वापरणं बंद केलं होतं. मलिक यांच्याकडून सातत्यानं आपण कोणत्याच गटासोबत नसल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र बुधवारपासून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी घड्याळ चिन्ह वापरण्यास सुरूवात केली आहे. अजित पवार यांची जनसन्मान यात्रा देखील 20 तारखे नंतर नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मतदारसंघात जाणार आहे.  


अजित पवार अन् एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनेटच्या वादावरून प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया


 कुठेही वाद नाही. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एका फाईल वरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली. यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता या वादाची बातमी काल्पनिक असू शकते. महायुतीत कुठेही वाद नाही महायुती एकदम घट्ट आहे. माहितीत आम्ही तिन्ही पक्षाच्या निर्णयाने काम करतो असे प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले आहेत.