Who is LTTE Supremo Velupillai Prabhakaran : लिट्टे (LTTE) संघटनेचा प्रमुख व्ही. प्रभाकरन (Velupillai Prabhakaran) जिवंत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रभाकरन भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येत सहभागी होता. तामिळनाडूचे माजी काँग्रेस मंत्री आणि तमिळ संघटनांच्या जागतिक महापरिषदेचे (World Confederation of Tamil's) अध्यक्ष पळा नेदुमारन (Pazha Nedumaran) यांनी हा दावा केला आहे. श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांचा नेता आणि एलटीटीई (LTTE) म्हणजेच तमिळ लिबरेशन टायगर ईलमचा (Liberation Tigers of Tamil Eelam) नेता व्ही. प्रभाकरन (V. Prabhakaran) जिवंत असल्याचा दावा नेदुमारन यांनी केलाय.

  


LTTE Prabhakaran Alive : लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन जिवंत


लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा (Liberation Tigers of Tamil Eelam) प्रमुख व्ही प्रभाकरन (Velupillai Prabhakaran) जिवंत आणि सुरक्षित असल्याचा खळबळजनक दावा पळा नेदुमारन यांनी केला आहे. त्यांनी तामिळनाडमध्ये एका पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे. नेदुमारन यांनी प्रभाकरन जिंवत असल्याचा दावा केला आहे. मात्र, तो सध्या कुठे वास्तव्यास आहे हे उघड केलेलं नाही. नेदुमारन यांनी सांगितलं की, प्रभाकरन लवकरच सर्वांसमोर येईल.


18 मे 2009 रोजी मृत्यू झाल्याचा दावा


दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, 18 मे 2009 रोजी श्रीलंका सरकारने प्रभाकरनला मृत घोषित केलं होतं. श्रीलंकन ​​सैनिकासोबत झालेल्या चकमकीत तो ठार झाल्याचा दावा सरकारने केला होता. श्रीलंकन सैन्याने त्याला चारही बाजूंनी घेरलं तेव्हा, प्रभाकरनने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा केला जात आहे.


Who is LTTE V Prabhakaran : कोण आहे लिट्टे प्रमुख प्रभाकरन?



  • लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा (Liberation Tigers of Tamil Eelam) प्रमुख व्ही प्रभाकरनचं (V Prabhakaran) नाव वेलुपिल्लाई प्रभाकरन (Velupillai Prabhakaran) आहे.

  • प्रभाकरन तमिळ बंडखोरांचा नेता आणि एलटीटीई (LTTE) म्हणजेच तमिळ लिबरेशन टायगर ईलमचा (Liberation Tigers of Tamil Eelam) प्रमुख आहे.

  • श्रीलंकेत तामिळ जनतेवर होत असलेला अत्याचार, दुजाभाव या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला होता. त्यातून सिंहली विरुद्ध तामिळ असा वांशिक गृहसंघर्ष सुरू होता.

  • LTTE ने तामिळींच्या अत्याचाराविरोधात संघर्ष सुरू केला. श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वेला स्वतंत्र तमिळ राज्य निर्माण करण्याची मागणी केली.

  • एलटीटीईने सुमारे तीन दशकांपर्यंत श्रीलंकेमध्ये दहशत निर्माण केली होती. त्यानंतर 2009 मध्ये श्रीलंका सरकार आणि लष्कराने एलटीटीई विरोधात मोठी मोहीम हाती घेतली होती.

  • या मोहिमेत एलटीटीई प्रमुख प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला.


प्रभाकरनच्या मृत्यूबाबत वेगवेगळे दावे


प्रभाकरनच्या मृत्यूबाबत वेगवेगळे मीडिया रिपोर्टसमोर आले होते. काही मीडिया रिपोर्टनुसार, श्रीलंकन ​​सैन्याने प्रभाकरनला चारही बाजूंनी घेरल्यानंतर त्याने LTTE समर्थकांसह स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. तर काही रिपोर्टनुसार, श्रीलंकन ​​सैन्याने केलेल्या हल्ल्यात प्रभाकरन मारला गेल्याचं सांगण्यात आलं होतं.


राजीव गांधी यांच्या हत्येमध्ये सामील


19 मे 1982 रोजी, तामिळनाडू पोलिसांनी दोन श्रीलंकन तरुणांना अटक केली होती. या तरुणांनी मद्रासमधील पाँडी बाजारात गोळ्या झाडत एकमेकांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या अटकेनंतर भारत आणि श्रीलंका दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. श्रीलंकन सरकारने भारत सरकारने दोन्ही तरुणांची सुटका करून त्यांना श्रीलंकेकडे सोपवण्याची विनंती केली. यावेळी तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री रामचंद्रन (M.G. Ramachandran) आणि तत्कालीन काँग्रेसचे मंत्री पी. नेदुमारन यांच्यावर तरुणांना सोडण्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी होती. या दोघांनी हा निर्णय घेण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विनंती केली. त्यानंतर या दोन्ही तरुणांची सुटका करुन त्यांना श्रीलंकेकडे सोपवण्यात आलं. 
 
महत्त्वाचं म्हणजे या दोन तरुणांपैकी एका तरुणाला दहा वर्षानंतर इंदिरा गांधी यांचा मुलगा, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सामील होता. हा तरुण म्हणजे प्रभाकरन होता. हाच व्ही. प्रभाकरन LTTE संघटनेचा प्रमुख बनला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत प्रभाकरनचा सहभाग होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


LTTE Prabhakaran Alive : बंडखोर तमिळ वाघांची संघटना लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन जिवंत! जागतिक तमिळ परिषदेच्या पी नेदुमारन यांचा दावा