नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊन्टवरुन त्यांनी केलेले ट्वीट्स आपोआप डिलीट होत आहेत. त्यामुळे प्रभू यांनी ट्विटर इंडियाकडे त्याबाबत तक्रारदेखील केली आहे. सुरेश प्रभू यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी केलेले ट्वीट्स आपोआप गायब होत आहेत. तसेच त्यांचे अनेक फॉलोअर्स हटवले गेले आहेत. प्रभू यांनी याबाबत त्यांच्या मित्र आणि फॉलोअर्सना याबाबत माहितीदेखील दिली आहे.


प्रभू यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझ्या प्रिय मित्रांनो मी एक विचित्र ट्रेण्ड नोटीस केला आहे. माझ्या टाईमलाईनवरुन अनेक पोस्ट्स गायब झाल्या आहेत. तसेच अनेक फॉलोअर्सना हटवण्यात आले आहे. मी ट्विटर इंडियाला आवाहन करतो की, त्यांनी हा प्रश्न सोडवावा.


दरम्यान, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे मंत्रीमंडळ स्थापन केले आहे. या नव्या मंत्रीमंडळात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना जागा देण्यात आलेली नाही. जुन्या मोदी सरकारच्या कार्यकाळात प्रभूंकडे सुरुवातीला रेल्वेमंत्रीपद देण्यात आले होते. त्यानंतर त्यांना वाणिज्य मंत्रीपद देण्यात आले.