नवी दिल्ली : दिल्लीच्या मेट्रोच्या राजीव चौक स्टेशनवरील एका स्क्रिनवर शनिवारी पॉर्न व्हिडीओ सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेला अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करुन सोशल मीडियावर शेअर केलं. पण दिल्ली मेट्रोकडून सुरुवातीला हे वृत्त फेटाळलं जात होतं. पण जेव्हा याचा व्हिडीओ प्रशासनाला दाखवण्यात आला, त्यावेळी यावर सारवासारव करण्यात आली.
दिल्ली मेट्रोचे प्रवक्ता अनुज दयाल यांनी सांगितलं की, DMRS ला (दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन) या व्हिडीओबद्दल काहीच माहिती नाही. पण स्टेशनवरील स्क्रिन खासगी ठेकदाराकडून चालवण्यात येत असून, त्याच्या तपासणीचं काम सध्या सुरु आहे. याचं काम अद्याप पूर्ण झालं नाही.
तसेच या घटनेची चौकशी करण्यात येणार असून, यानंतरच कारवाई करु असं दयाल यांनी स्पष्ट केलं. शिवाय अशा घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल असंही सांगितलं.
दरम्यान, गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पुण्यातील कर्वे रोडवरील मोठ्या स्क्रिनवर पॉर्न व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेवेळी कर्वे रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचं यावेळी सांगण्यात येत होतं.
संबंधित बातम्या
कर्वे रोडवर मोठ्या स्क्रीनवर पॉर्न, ट्रॅफिक जॅममुळे पुणेकरांचे वाजले हॉर्न
पॉर्न सर्चमध्ये भारत जगात ‘भारी’, पुणेकरांची आवड न्यारी, गुगल ट्रेंडची आकडेवारी